अहमदनगर : एकेकाळी राजर्षी शाहू महाराजांनी आपला खजिना खाली करून बहुजनांना शिक्षणाची कवाडे खुली केली. शाहू महाराजांच्या शैक्षणिक धोरणमुळेच बहुजनांची पोरं शिकली. आजतागायत झालेला सामाजिक विकास ही शाहू महाराजांची देण असल्याचे मत सामाजिक-राजकीय अभ्यासक आंनद शितोळे यांनी व्यक्त केले. निंबळक येथे पार पडलेल्या नगर तालुका ग्रामीण साहित्य संमेलनात आयोजित व्याख्यान सत्रात ते बोलत होते.
Marathi News: संत तुकारामांच्याप्रमाणे लेखकांनीही ‘ते’ काम करावे; संमेलनाध्यक्ष डॉ. शिरीष लांडगे यांचे मत https://t.co/Q8dknuQ2Le
— Krushirang (@krushirang) June 28, 2022
ते म्हणाले की, मागच्या राज्य सरकारने कमी पटाच्या शाळा ‘परवडत नसल्याची’ बतावणी करून बंद पाडल्या आहेत. याआडून बहुजन समाजातील गोरगरीब, आदिवासी, शेतमजुरांच्या मुलांचा शिक्षणाचा अधिकार डावलला जात आहे. शाहू महाराजांनी सामाजिक न्यायाची पायाभरणी केली. विधवा, परितक्त्या महिलांना पोटगी, मालमत्तेत अधिकार मिळावा, यासाठी कायदे केले. त्यांची अंमलबजावणीही केली. शाहू महाराजांनी पुनर्विवाहाची तसेच आंतरजातीय विवाहांची चळवळ उभी करून जातीअंतासाठी लढा उभारला. शाहू महाराज दूरदृष्टी लाभलेले कल्याणकारी राज्याची संकल्पना सत्यात उतरविणारे राजे होते. त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले. राज्यभर शैक्षणिक संस्थांचे जाळे उभारले. वसतिगृह उभारले. औद्योगिक क्रांतीपेक्षा शैक्षणिक क्रांती महत्वाची आहे, ही बाब त्यांच्या लक्षात आली होती. त्यांच्यामुळेच बहुजनांचा आर्थिक आणि सामाजिक विकास झाला असल्याचे मत शितोळे यांनी व्यक्त केले. (Ahmednagar: Once upon a time, Rajarshi Shahu Maharaj lowered his treasury and opened the doors of education to the masses. Bahujan’s children learned only because of Shahu Maharaj’s educational policy. Socio-political scholar Anand Shitole expressed the view that the social development that has taken place till date is the gift of Shahu Maharaj. He was speaking at a lecture session organized at Nagar Taluka Gramin Sahitya Sammelan held at Nimbalak.)
PM Kisan: पीएम किसानच्या लाभार्थ्यांना मोठा झटका! सरकारने बंद केली ‘ही’ मोठी सुविधा https://t.co/FRMMjRVvm3
— Krushirang (@krushirang) June 28, 2022