Alok Sharma : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात काँग्रेस प्रवक्ते आलोक शर्मा यांनी मराठी माणसाबद्दल दिलेल्या एका वक्तव्यामुळे सध्या राजकारण चांगलंच तापलं आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, काँग्रेस प्रवक्ते आलोक शर्मा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका हिंदी वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान आलोक शर्मा यांनी या गोष्टी सांगितल्या. बदलापुरातील लैंगिक शोषणाचे प्रकरण त्यांनी संपूर्ण मराठी समाजाशी जोडले. त्याने संपूर्ण समाजाला बलात्काऱ्यांशी जोडल्याचा आरोप विरोधक करत आहे.
या प्रकरणात शिंदे गटाने X वर आलोक शर्मा यांचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यासोबत लिहिले की, “काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आलोक शर्मा यांनी मराठी माणसाला बलात्कारी म्हणत संपूर्ण समाजाचा अपमान केला आहे.”
गुन्हा दाखल
शिवसेनेने दुसऱ्या एका पोस्टमध्ये लिहिले आहे की, “काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आलोक शर्मा यांना बलात्कारी म्हणत मराठी माणसाचा आणि महाराष्ट्राचा अपमान केला आहे. याच्या निषेधार्थ शिवसेनेचे सोशल मीडिया प्रदेश प्रमुख आणि युवासेना सरचिटणीस राहुल कानल यांनी मुंबईत तक्रार केली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी आलोक शर्मा यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.