Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Recharge Plan : ‘या’ कंपनीच्या रिचार्ज प्लानमध्ये फायदाच फायदा.. जिओलाही टाकले मागे; जाणून घ्या..

Recharge Plan : Reliance Jio आणि Vodafone Idea या कंपन्यांकडे अनेक उत्तम रिचार्ज प्लान (Recharge Plan) आहेत. दोन्ही कंपन्यांच्या काही अशा रिचार्ज प्लान आहेत जे एकमेकांशी खूप साम्य आहेत. जर तुमच्याकडे Jio किंवा Vi कंपनीचे सिमकार्ड असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची ठरणार आहे. आज या लेखात आम्ही Jio आणि Vodafone Idea कंपनीच्या अशा दोन योजनांबद्दल माहिती देणार आहोत जे समान किंमतीत येतात.

Advertisement

Jio 499 Plan : या Reliance Jio प्रीपेड प्लॅनसह कंपनी दररोज 2 GB हाय-स्पीड डेटा, कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉइस कॉल आणि दररोज 100 SMS देते. 2GB डेटा वापरल्यानंतर स्पीड 64 Kbps पर्यंत कमी होईल. या प्लानमध्ये 28 दिवसांची वैधता (Validity) मिळेल. इतर फायद्यांबद्दल सांगायचे तर या प्लॅनमध्ये Jio Cinema, Jio Cloud, Jio TV आणि Jio Security सारख्या अॅप मोफत प्रवेश मिळेल. याशिवाय कंपनी डिस्ने + हॉटस्टार मोबाइलचे 499 रुपयांचे सबस्क्रिप्शन (Subscription) देखील देत आहे.

Loading...
Advertisement

Vi 499 Plan : Vodafone Idea प्लॅनसह कंपनी दररोज 2 GB हाय-स्पीड डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉल आणि 100 SMS प्रतिदिन देत आहे. इतर फायद्यांबद्दल सांगायचे तर या प्लॅनसह डिस्ने प्लस हॉटस्टार मोबाइलची एक वर्षाच्या वैधतेसह विनामूल्य सदस्यता दिली जात आहे. 2GB डेटा वापरल्यानंतर वेग कमी होऊन 64Kbps होईल. कंपनी या प्लानसह 28 दिवसांची वैधता देते. याशिवाय कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय या प्लॅनमध्ये प्रत्येक महिन्याला 2 GB पर्यंत बॅकअप डेटाची सुविधा दिली जात आहे.

Advertisement

दोन्ही प्लान सारखेच वाटू शकतात, परंतु व्होडाफोन आयडीया रिचार्ज प्लानचे इतर बरेच फायदे आहेत. फायद्यांच्या बाबतीत कंपनी पुढे रिलायन्स जिओपेक्षा पुढे आहे. त्यामुळे रिचार्ज करण्याआधी तुम्ही या गोष्टीचा विचार करू शकता.

Advertisement
Advertisement

Leave a Reply