Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Congress President Election : अध्यक्षपद निवडणुकीत आणखी एक उमेदवार.. पहा, कुणी केलाय दावा ?

Congress President Election : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह (Digvijay Singh) काँग्रेस अध्यक्षपदासाठी (Congress President Election) निवडणूक लढणार की नाही ? तूर्तास ते स्पष्ट झाले नसले तरी पक्ष नेतृत्वाने विचारल्यास आपण मैदानात उतरू शकतो, असे संकेत त्यांनी दिले आहेत. पक्षाच्या वरिष्ठ पदासाठी दावा करण्यासाठी ते दिल्लीत वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊ शकतात, असे वृत्त होते. सध्या या निवडणुकीत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (CM Ashok Gehlot) आणि तिरुअनंतपुरमचे खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) यांची प्रमुख नावे आहेत.

Advertisement

अध्यक्षपदासाठी निवडणूक लढण्याच्या अटकळीवर सिंह म्हणाले की, आजपर्यंत याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, ‘कोणतीही चर्चा झाली नाही, होणारही नाही आणि मी वेळ मागितला नाही.’ दिल्ली दौऱ्याबाबत ते म्हणाले की, भारत जोडो यात्रेशी (Bharat Jodo Yatra) संबंधित एका बैठकीला उपस्थित राहण्यासाठी ते दिल्लीला पोहोचले आहेत.

Loading...
Advertisement

त्याचवेळी निवडणूक लढण्याच्या प्रश्नावर ज्येष्ठ नेते म्हणाले, ‘नेतृत्वाचा आदेश काहीही असला तरी दिग्विजय सिंह ते पाळत आले आहेत आणि पुढेही करत राहतील.’ नुकतेच ते म्हणाले होते, ‘त्यांनी त्यांच्या नामांकनाची तारीखही घोषित केली होती. सिंग म्हणाले, की ‘प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. याचे उत्तर तुम्हाला 30 तारखेला संध्याकाळी मिळेल’. विशेष म्हणजे 30 सप्टेंबर ही नामांकनाची शेवटची तारीख आहे.

Advertisement

गेहलोत यांच्या दोन पदांवर राहण्याच्या इच्छेलाही ते विरोध करत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. जेव्हा ते मुख्यमंत्रीपद सोडण्यास तयार नसल्याची बातमी माध्यमांसमोर येते तेव्हा मी त्यांच्यावर विश्वास ठेवू शकत नाही. ते अत्यंत निष्ठावान, प्रामाणिक राजकारणी राहिले आहेत. तर थरूर यांच्याबद्दल ते म्हणाले, की ‘ते एक सक्षम आणि खूप चांगले व्यक्ती आहेत, मी त्यांचा आदर करतो.’ काँग्रेसने (Congress) जारी केलेल्या अधिसूचनेनुसार उमेदवारी प्रक्रिया 30 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. त्याचवेळी 17 ऑक्टोबरला पक्षप्रमुखासाठी मतदान होणार आहे. 19 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply