Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Technology : चीनला मोठा झटका..! जगातील ‘या’ दिग्गज कंपनीबाबत भारताबाबत घेतला ‘हा’ निर्णय

Technology : अॅपल इंडिया 2025 पर्यंत भारतात चारपैकी एक फोन बनवू शकते, जेपी मॉर्गनच्या संशोधकाने बुधवारी ही माहिती दिली आहे. असे अपेक्षित आहे, की Apple 2022 च्या अखेरीस जवळपास 5% स्मार्टफोनचे उत्पादन भारतात (India) हस्तांतरित करेल, जे चीननंतर (China) जगातील दुसरे सर्वात मोठे स्मार्टफोन (Smartphone) मार्केट आहे. चीनमध्ये वाढता भौगोलिक-राजकीय तणाव आणि कडक COVID-19 लॉकडाऊनमुळे कंपनीने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. हा निर्णय आता लवकरच प्रत्यक्षात येईल. त्याचा चीनला मोठा फटका बसणार आहे. चीनला या नुकसानीतून बाहेर पडण्यास काही काळ लागणार आहे.

Advertisement

अहवालानुसार, मॅक, आयपॅड, अॅपल वॉच आणि एअरपॉड्ससह कंपनीच्या सर्व उत्पादनांपैकी सुमारे 25% उत्पादने 2025 पर्यंत चीनच्या बाहेर उत्पादित केली जातील. कोरोना काळात पुरवठ्यात कमतरता होती. परंतु आता अॅपलसह बहुतेक कंपन्या यावर्षी पुरवठा साखळी निश्चित करत आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला ब्लूमबर्गच्या एका अहवालात असे म्हटले, आहे की टाटा समूह देशात स्मार्टफोनसाठी संयुक्त उपक्रम स्थापन करण्यासाठी विस्ट्रॉन कंपनीबरोबर चर्चा करत आहे.

Loading...
Advertisement

तसे पाहिले तर तंत्रज्ञानाच्या (Technology) बाबतीत आज चीन जगात आघाडीवर आहे. मोबाइलसह सर्वच इलेक्ट्रॉनिक उपकरणे चीनमधूनच जगभरात पुरवठा केले जातात. चीनचे स्मार्टफोनने तर अमेरिकेसह अनेक देशांच्या बाजारपेठआ काबीज केल्या आहेत. अशा परिस्थितीत अॅपलने चीनला मोठा झटका दिला आहे. कंपनीने स्मार्टफोनचे उत्पादन भारतात सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने देशातील तंत्रज्ञान क्षेत्राला त्याचा मोठा फायदा होणार आहे. चीनच्या स्पर्धेत हा निर्णय भविष्यात महत्वाचा ठरणार आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply