Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Russia Ukraine War : युद्धसमयी अमेरिकेने भारताला केली ‘ही’ विनंती; पहा, युद्ध थांबणार का ?

Russia Ukraine War : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी अलीकडेच रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्याशी रशिया युक्रेन युद्धावर चर्चा केली. अमेरिका आणि फ्रान्ससह इतर अनेक पाश्चिमात्य देशांनी यासाठी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले. मात्र, पुतिन यांनी रशियात (Russia) सैन्य जमा करण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच त्यांनी पाश्चिमात्य देशांना आमचा मुद्दा हलक्यात घेऊ नका, असा इशारा दिला आहे.

Advertisement

रशियाच्या सुरक्षेसाठी आम्ही काहीही करायला तयार आहोत, असे पुतीन म्हणाले. पुतिन यांचे धोरण पाहता अमेरिकेने (America) पंतप्रधान मोदींना आवाहन केले आहे, की त्यांनी रशियाला युक्रेनमधील (Ukraine) युद्ध मिटविण्याच्या दृष्टीने रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना सांगावे. समरकंदमध्ये पुतीन यांच्यासोबत झालेल्या भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते, की ‘आता युद्धाचा काळ नाही. तुम्ही तुमच्या शेजारी देशाला बळाने जिंकू शकत नाही.’ अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन यांनी गेल्या आठवड्यात एससीओ शिखर परिषदेत पुतिन यांच्याबद्दल मोदींनी केलेल्या वक्तव्याचे स्वागत केले होते आणि ते “तत्त्वपूर्ण विधान” असल्याचे म्हटले होते.

Loading...
Advertisement

फ्रान्सचे (France) राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनीही पंतप्रधान मोदींचे कौतुक केले. युनायटेड नेशन्सच्या (United Nations) आमसभेत ते म्हणाले की, आता युद्धाची वेळ नाही, असे पंतप्रधान मोदींचे म्हणणे अगदी योग्य आहे. फ्रान्स आणि अमेरिका या दोन्ही देशांनी या मुद्द्यावर भारताच्या (India) भूमिकेचे स्वागत केले आहे. पीएम मोदी यावर्षी संयुक्त राष्ट्र महासभेच्या अधिवेशनाला संबोधित करणार नाहीत. मात्र, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) पाश्चिमात्य देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीला नक्कीच उपस्थित राहणार आहेत.

Advertisement

व्लादिमीर पुतिन यांनी पाश्चिमात्य देशांना इशारा देताना म्हटले आहे की, ‘जे लोक रशियाविरोधात अशा प्रकारच्या वक्तव्यांना प्रोत्साहन देत आहेत, त्यांनी हे लक्षात ठेवावे की, नाटो (NATO) देशांशी व्यवहार करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी रशियाकडेही आहेत. जेव्हा जेव्हा आपल्या देशाच्या एकतेला आणि अखंडतेला धोका निर्माण होईल तेव्हा आम्ही आमची पूर्ण शक्ती वापरू. पुतिन म्हणाले की, हा इशारा कोणीही हलक्यात घेऊ नये. दरम्यान, बुधवारपासून पुतिन यांनी लष्करी जमाव करण्याचे आदेश दिले आहेत. या अंतर्गत, ते नागरिक तयार केले जातील ज्यांनी कधी काळी लष्करी प्रशिक्षण घेतले होते.

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply