Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Corona Virus : कोरोना अजून आहेच.. देशभरात सापडलेत ‘इतके’ नवीन रुग्ण; लसीकरणाचीही मिळाली माहिती..

Corona Virus : देशात गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे (Corona Virus ) 4 हजार 510 नवीन रुग्ण आढळले आहेत. या दरम्यान 5,640 लोक कोरोना संसर्गातून बरेही झाले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात कोरोनाच्या एकूण अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 46 हजार 216 झाली आहे. देशातील कोरोनाचा सकारात्मकता दर (Positivity Rate) 1.33 टक्के आहे. साप्ताहिक सकारात्मकता दर 1.80% नोंदवला गेला.

Advertisement

गेल्या 24 तासांत देशात 3 लाख 39 हजार 994 (3,39,994) कोरोना चाचण्या (Corona Test) घेण्यात आल्या. भारतात आतापर्यंत एकूण 89.23 कोटी कोरोना चाचण्या झाल्या आहेत. गेल्या 24 तासात 5,640 कोरोनाबाधित बरे झाले आहेत. 2020 मध्ये कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्या लोकांची संख्या 4,39,72,980 वर गेली आहे. सध्या देशात कोरोनाचा बरा होण्याचा दर 98.71 टक्के आहे. देशव्यापी लसीकरण (Vaccination) मोहिमेअंतर्गत देशात 216.95 कोटी पेक्षा जास्त लसीचे डोस देण्यात आले आहेत.

Loading...
Advertisement

जागतिक आरोग्य संघटनेचे (World Health Organisation) प्रमुख डॉ. घेब्रेयेसस यांनी मागील ऑगस्ट महिन्यात सांगितले होते, की ‘कोरोनाला हद्दपार करण्याच्या दृष्टीने आजसारखी सकारात्मक स्थिती (Positive Sign) आतापर्यंत कधी दिसली नाही. कोरोना लवकरच संपुष्टात येऊ शकतो. पण त्यासाठी आवश्यक ते निर्णय घेण्याची सध्या गरज निर्माण झाली आहे. आपण संधीचा फायदा घेतला नाही तर आपणाला आणखी कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचा (Variant) सामना करावा लागू शकतो. यातून मृत्युंची संख्या वाढू शकते, आणखी अडथळे येतील आणि अधिक अनिश्चिततेचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply