Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Onion Price : बाजार समितीत कांद्याला मिळालाय ‘इतका’ भाव; पहा, ‘या’ जिल्ह्यात काय आहे भाव

Onion Price : सध्या बाजार समितीत कांद्याला बऱ्यापैकी भाव मिळत आहेत. नगर जिल्ह्यातील बाजार समित्यांचा विचार केला तर येथे एक नंबर कांद्याला (Onion Price) सरासरी 1700 ते 1800 रुपये प्रति क्विटल दरम्यान भाव मिळत आहेत. सध्या बाजार समितीत (Market Committee) कांद्याची आवक जेमतेम आहे. सोमवारी (19 सप्टेंबर) सुद्धा हा ट्रेंड कायम असल्याचे दिसून आले. नगर जवळील नेप्ती उपबाजार समितीत तब्बल 34 हजार 14 क्विंटल कांद्याची आवक झाली होती. यावेळी लिलावात प्रथम प्रतवारीच्या कांद्याला (Onion) सरासरी 1300 ते 1700 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला.

Advertisement

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी लिलावासाठी 34 हजार 14 क्विंटल कांद्याची आवक झाली होती. त्यात प्रथम प्रतवारीच्या कांद्याला 1250 ते 1600 रुपये, दोन नंबर कांद्याला 800 ते 1250 रुपये, तीन नंबर कांद्याला 400 ते 800 रुपये आणि चार नंबर कांद्याला 100 ते 400 रूपये बाजारभाव मिळाला. मागील काही दिवसांपासून कांद्याला याच पद्धतीने भाव मिळत आहेत. सध्या कांद्याची आवक वाढली आहे. तरी देखील भाव कमी झालेले नाहीत. कांद्याला मागणी वाढली आहे. सोमवारी बाजार समितीत कांद्याला सरासरी 1600 रुपयांपर्यंत भाव मिळाला. जिल्ह्यातील अन्य बाजार समित्यांमध्येही याच पद्धतीने भाव मिळत आहेत.

Loading...
Advertisement

Advertisement

काही दिवसांपूर्वी कांद्याची आवक घटली होती. त्यावेळी भावही कमी मिळत होते. मात्र, मान्सूनच्या (Monsoon) आगमनानंतर कांदा आवकेत वाढ होण्यास सुरुवात झाली. आजमितीस सरासरी 40 हजार क्विंटलपर्यंत आवक होत आहे. आवक वाढली असली तरी भाव मात्र फारसे कमी झालेले नाहीत. मागील दीड महिन्यापासून नगरसह जिल्ह्यातील अन्य बाजार समित्यांत कांद्याला साधारण 1700 ते 1800 रुपयांदरम्यान भाव मिळत आहेत.

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply