Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Jio-Airtel कंपन्यांना मोठा झटका; ‘या’ कारणामुळे लाखो लोकांनी फिरवली पाठ; जाणून घ्या..

Jio : भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (TRAI) मासिक अहवालानुसार, टेलिकॉम कंपन्यांच्या वापरकर्त्यांमध्ये मोठी घट झाली आहे. Airtel, Jio आणि Vodafone-Idea (Vi) सारख्या दूरसंचार कंपन्यांच्या वापरकर्त्यांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. TRAI च्या अहवालानुसार, 2021 मध्ये टेलिफोन ग्राहकांची संख्या 117.84 कोटी झाली आहे, तर 2020 मध्ये ही संख्या 117.3 कोटी होती.

Advertisement

वास्तविक, टेलिकॉम कंपन्यांचे युजर्स कमी होण्याचे कारण जास्त दराचे रिचार्ज प्लॅन (Recharge Plan) असल्याचे मानले जात आहे. बहुतेक वापरकर्ते आधीच दोन सिम कार्ड एकाच वेळी वापरत आहेत, परंतु आता रिचार्ज प्लानच्या वाढत्या दरांमुळे ते त्यांचे दुय्यम सिम वापरणे बंद करत आहेत. अशा स्थितीत टेलिकॉम कंपन्यांनाही याचा मोठा फटका बसत आहे. गेल्या वर्षी ट्रायच्या मासिक अहवालात असे सांगण्यात आले होते, की 2021 मध्येच जिओच्या सुमारे 2 कोटी ग्राहकांनी कंपनी सोडली होती.

Advertisement

Loading...
Advertisement

ट्रायच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, जिओ अजूनही पहिल्या क्रमांकावर आहे. तर एअरटेल दुसऱ्या तर Vi तिसऱ्या क्रमांकावर आहे. जुलैमध्ये, जिओने एकूण 2.9 दशलक्ष म्हणजेच 29 लाख नवीन ग्राहक जोडले आणि एअरटेलने 5 लाख नवीन ग्राहक जोडले. दुसरीकडे, जुलैमध्ये बीएसएनएल (BSNL) आणि व्होडाफोन आयडीया कंपनीला चांगलाच फटका बसला आहे. बीएसएनएलचे 8 लाख आणि व्होडाफोन आयडीया कंपनीचे सुमारे 15 लाख ग्राहक कमी झाले आहेत.

Advertisement

ट्रायच्या अहवालानुसार, जिओच्या वापरकर्त्यांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. जून 2022 पर्यंत Jio चे 383.24 दशलक्ष वापरकर्ते होते, जे जुलै 2022 पर्यंत 382.17 दशलक्ष झाले. म्हणजेच सुमारे 1.07 (10 लाख 70 हजार) ग्राहकांनी Jio सोडले आहे. त्याच वेळी, एअरटेलचे जूनमध्ये 357.21 वापरकर्ते होते, जे आता 356.17 दशलक्ष झाले आहे, जे जुलैमध्ये सुमारे 1 दशलक्षने कमी झाले आहे. व्होडाफोन-आयडियाच्या वापरकर्त्यांमध्ये एका महिन्यात 17.5 लाख आणि बीएसएनएलच्या ग्राहकांमध्ये 5 लाखांनी घट झाली आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply