Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Malai Paneer : घरच्या घरी तयार करा हॉटेल स्टाइल मलाई पनीर; रेसिपीही आहे एकदम सोपी

Malai Paneer : एखादा समारंभ असो किंवा काही खास प्रसंग असो पनीरची भाजी असतेच. आपल्याकडे पनीरला नेहमीच मागणी असते. पनीरची भाजीही जास्त पसंत केली जाते. त्यामुळे पनीरपासून अनेक खाद्यपदार्थ तयार केले जातात. विविध प्रकारच्या भाज्याही तयार केल्या जातात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका खास पनीर भाजीच्या डिशची माहिती देणार आहोत. ही डिश म्हणजे मलाई पनीर (Malai Paneer). मलाई पनीरमध्ये भरपूर प्रोटीन असते आणि ही रेसिपी (Recipe) बनवायला जास्त वेळ लागत नाही. जर तुम्ही ही रेसिपी आत्तापर्यंत ट्राय केली नसेल, तर आता ट्राय करून पहा. ही भाजी कशी तयार करायची याची रेसिपी माहिती करून घ्या.

Advertisement

Advertisement

साहित्य – पनीर – 2 कप, कांदा – 1, मलाई – 1/2 कप, अद्रक-लसूण पेस्ट – 1 चमचा, लाल मिरची – 1/2 चमचा, धने पावडर – 1 चमचा, गरम मसाला – 1/4 चमचा, कसुरी मेथी – 1/2 चमचा, हळद – 1/4 चमचा, हिरवी कोथिंबीर – 2-3 चमचे, तेल – 2 चमचे, मीठ – चवीनुसार.

Loading...
Advertisement

रेसिपी

Advertisement

आधी पनीर घेऊन त्याचे चौकोनी तुकडे करा. आता कढईत तेल टाकून मध्यम आचेवर गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात बारीक केलेला कांदा घाला. कांदा मऊ आणि सोनेरी होईपर्यंत परता. आता अद्रक-लसूण पेस्ट टाकून कांदा काही सेकंद शिजू द्या. या मिश्रणातून सुगंध यायला लागल्यावर गॅस कमी करून त्यात धने पावडर, हळद आणि लाल तिखट टाकून चांगले मिसळून घ्या.

Advertisement

मसाले आणखी काही वेळ शिजल्यानंतर त्यात पनीरचे तुकडे टाका आणि मसाल्याबरोबर चांगले मिसळा. सुमारे 1 मिनिट शिजल्यानंतर, पनीरमध्ये मलई टाका. आता गॅस मध्यम आचेवर ठेवा आणि भाजी शिजू द्या. यानंतर भाजीमध्ये चवीनुसार गरम मसाला आणि मीठ यासह इतर कोरडे मसाले टाका. दोन ते तीन मिनिटे शिजल्यानंतर गॅस बंद करा. तुमची स्वादिष्ट मलाई पनीर भाजी तयार आहे. त्यात हिरवी कोथिंबीर सजवून रोटी, पराठ्यासोबत सर्व्ह करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply