Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

World News : बाब्बो.. ‘या’ व्यावसायिकाने दान केली अब्जावधींची कंपनी..! आपल्यावरील संकट टाळण्यासाठी करणार ‘हे’ काम

World News : जगभरात आज हवामान बदलाचे (Climate Change) संकट उभे राहिले आहे. खरे तर या संकटाला आपणही तितकेच जबाबदार आहोत. अपरिमित वृक्षतोड, वाढत जाणारे प्रदूषण, रसायनांमुळे प्रदूषित होणाऱ्या नद्या, प्लास्टिकचा वाढता कचरा या गोष्टींमुळे संकट आधिक गडद होत आहे. या संकटाची दाहकता कमी करण्यासाठी आता वेगाने प्रयत्न होत आहेत. विकसित देश आणि विकसनशील देश यासाठी प्रयत्न करत आहेत. यासाठी अमेरिकेतील (America) एका 83 वर्षीय व्यावसायिकाने हवामान बदलाच्या समस्येशी लढण्यासाठी कंपनीला तब्बल 2.39 ट्रिलियन रुपये दान केले.

Advertisement

हवामान संकटाचा सामना करण्यासाठी कोणीतरी देणगी दिल्याची ही एक अनोखी घटना आहे. कपड्यांच्या किरकोळ विक्रेत्या पॅटागोनियाचे संस्थापक, यव्होन चौनार्ड यांनी पृथ्वी (Save Earth) वाचविण्यासाठी आपली 50 वर्षे जुनी कंपनी दान केली आणि चौनार्डने स्वतः सांगितले की, आता फक्त पृथ्वी त्याच्या कंपनीचा एकमेव भागधारक आहे. पृथ्वी (Earth) धोक्यात आहे, ती वाचवा, असे ते म्हणाले. त्यांनी आपल्या कंपनीचा सर्व महसूल हवामान संकटाशी लढण्यासाठी दान केला.

Advertisement

Loading...
Advertisement

 

Advertisement

चौनार्ड यांनी त्यांची सर्व मालमत्ता परिधान कंपनीला दान करण्याची घोषणा केली आहे. अहवालानुसार, पॅटागोनिया कंपनीची किंमत सुमारे $3 अब्ज (रु. 2.39 ट्रिलियन) आहे. कंपनीचे सर्व कॉर्पोरेट महसूल हवामान संकटाचा सामना करण्यासाठी, जैवविविधतेचे संरक्षण आणि वन्य जमिनींचे संरक्षण करण्यासाठी काम करणाऱ्या संस्था आणि गटांना दान केले जाईल, असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे. चौनार्डचे पत्र पॅटागोनियाच्या अधिकृत वेबसाइटवर पोस्ट केले गेले आहे. त्यांनी लिहिले, की “सध्या धोक्यात असणाऱ्या या ग्रहाचे रक्षण करण्यासाठी आपल्याकडे काही संसाधने असतील तर आपण सर्वांनी जे काही करता येईल ते केले पाहिजे.”

Advertisement

मात्र, ते पुढे म्हणाले की, पर्यावरणाच्या संकटावर मात करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत, मात्र ते पुरेसे नाही. या संकटाशी लढण्यासाठी आपल्याला अधिक पैसे खर्च करण्याचा मार्ग शोधण्याची गरज आहे. आमच्याकडे एक पर्याय होता तो म्हणजे पॅटागोनियाला विकणे आणि दान करणे, असे ते म्हणाले. त्याच वेळी, कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की सध्याची उलाढाल शंभर दशलक्ष डॉलर्स (7.97 अब्ज रुपये) इतकी आहे आणि आता दरवर्षी ही संपूर्ण रक्कम पृथ्वी वाचवण्यासाठी दान केली जाईल.

Advertisement
Advertisement

Leave a Reply