Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Sharad Pawar: अमेठीनंतर बारामतीची बारी..! भाजप देणार पवारांना झटका

Sharad Pawar: पुणे : लोकसभेच्या निवडणुकीत (Loksabha election) अमेठी (Amethi) लोकसभा मतदारसंघातून राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा पराभव केल्यानंतर भाजपने आता (BJP) 2024 ला राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाकडे नजर वळवली आहे. पवारांच्या ताब्यात असलेला मतदारसंघ काढून घेण्यासाठी भाजपने केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांचा तीन दिवसीय दौरा निश्चित केला आहे. 22, 23 आणि 24 सप्टेंबर रोजी सितारामन या बारामतीत तळ ठोकून असणार आहेत.

Advertisement

बारामती लोकसभा मतदारसंघ कुठल्याही परिस्थितीत भाजपच्या ताब्यात येईल, यासाठी पक्षश्रेष्ठींनी केंद्रीय पातळीवरील बडे नेते बारामतीत येणार असल्याचे नियोजन केले आहे. 2024 लोकसभा निवडणुकीत बारामतीतून भाजपचाच खासदार निवडून येईल, यासाठी दिल्लीवरून नियोजन सुरु आहे. तसेच यासंदर्भात इंदापूर येथे भाजप पदाधिकाऱ्यांची हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil)  यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली या दौऱ्याच्या नियोजनासाठी 6 सप्टेंबर रोजी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar bavankule) हे देखील बारामती लोकसभा मतदारसंघात येणार आहेत असे यावेळी सांगण्यात आले.

Loading...
Advertisement

२०१९ च्या निवडणुकीत भाजपने ए फॉर अमेठी ही मोहीम फत्ते करुन अमेठी ताब्यात घेतली. आता भाजपची नजर बारामतीवर असल्याने ‘बी फॉर बारामती’ ही मोहिम भाजपने हाती घेतली आहे,” असे बारामती लोकसभा मतदारसंघ भाजप प्रभारी राम शिंदे (Ram Shinde) यांनी सांगितले. इंदापूर येथील अर्बन बँकेच्या सभागृहात सीतारामन,बावनकुळे यांचा दौऱ्यांच्या पार्श्वभूमीवर आयोजित भाजप संवाद बैठकीत राम शिंदे बोलत होते. यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, किसन मोर्चा प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, पृथ्वीराज जाचक, अविनाश मोटे, उदयसिंह पाटील, मयूरसिंह पाटील, मारुती वणवे, तेजस देवकाते यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

Advertisement

राम शिंदे म्हणाले, “2019 ला कोणालाही वाटेल नव्हते अमेठीतील गांधी पराभूत होतील पण भाजपने ते करून दाखवले,आता 2024 ला बी फॉर बारामतीचे मिशन हाती घेतले आहे. यासाठीच अर्थमंत्री बारामती लोकसभा मतदारसंघ दौऱ्यावर येत आहेत.” हर्षवर्धन पाटील म्हणाले, “बारामती लोकसभा मतदारसंघ दौऱ्यावर येणाऱ्या निर्मला सीतारामन याचे इंदापूर मध्ये भव्य स्वागत केले जाणार आहे. त्यांच्या माध्यमातून केंद्रीय पातळीवरील प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील. आता केंद्रात आणि राज्यात आपले सरकार असल्याने कोणत्याही विकास कामाना अडचण येणार नाही,” यावेळी जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व निर्मला सीतारामन यांच्या दौऱ्यांच्या नियोजनाची माहिती दिली.

Advertisement
Advertisement

Leave a Reply