Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Pune News: गडकरींच्या उडत्या बसमध्ये बसण्याची जयंत पाटीलांना आतुरता; केली नितीन गडकरींची थट्टा

Pune News: पुणे: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी पुण्यातील वाहतूक (Pune Traffic Problem) कोंडीसाठी स्काय बस (Sky Bus) प्रकल्प केला पाहिजे असे वक्तव्य केल्यानंतर त्यावरून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत त्यावर आता राष्ट्रवादीचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी देखील गडकरी यांच्या घोषणेची चांगलीच थट्टा केली मी उडत्या बसची वाट बघत बसलो त्यामुळे यायला उशीर झाला अशा शब्दात टीका केली.

Loading...
Advertisement

पुण्यातील मानाच्या गणपतीच्या दर्शनासाठी जयंत पाटील आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पुण्यातील वाहतुकीची समस्या हा कायमच चर्चेचा विषय. या समस्येवर केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी उडत्या बसचा प्रकल्प सुचविला, त्यासाठी पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation) प्रस्ताव पाठवावा अशी सूचना केली आहे. गणपतीच दर्शन करण्यासाठी दुपारपासून जात आहे.रस्त्यावर प्रचंड गर्दी आहे.उडत्या बसची वाट बघितली. त्यामुळे वेळ झाला. अजून उडती बस नाही. हे लक्षात आलं म्हणून मग चालतच सगळे गणपती फिरत आहे. असा टोला राष्ट्रवादीचे नेते व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला.

Advertisement
Advertisement

Leave a Reply