Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

PM Kisan: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा; ई-केवायसीसाठी ७ सप्टेंबरपर्यंत मुदत

PM Kisan: पुणे: केंद्र सरकारकडून शेतकऱ्याच्या बँक खात्यात वर्षाला थेट सहा हजार रुपये जमा केले जाणाऱ्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला (Pradhanmantri Kisan nidhi Sanman Yojana) लोकप्रियता लाभली आहे. पण अद्याप पुणे (Pune) जिल्ह्यातील १ लाख ५९ हजार ८६३ शेतकऱ्यांचे ई-केवायसी (E KYC) प्रमाणीकरण प्रलंबित आहे. पोर्टलवरील नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांची ई-केवायसी करण्यासाठी ७ सप्टेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून या मुदतीत प्रमाणीकरण करुन घ्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Collector Rajesh Deshmukh)यांनी केले आहे.

Advertisement

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत (PM-KISAN) पात्र लाभार्थ्याना ई-केवायसी करण्यासाठी ओटीपी किंवा बायोमेट्रीक हे पर्याय उपलब्ध करुन दिले आहेत. योजनेच्या लाभासाठी सर्व पात्र शेतकऱ्यांनी वेळेत ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. जिल्ह्यात आजअखेर एकूण ४ लाख ९८ हजार २७८ शेतकऱ्यांपैकी ३ लाख ३८ हजार ४१५ शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रमाणीकरण पूर्ण केलेले आहे. उर्वरीत १ लाख ५९ हजार ८६३ लाभार्थ्यांचे ई-केवायसी प्रमाणीकरण प्रलंबित आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

Loading...
Advertisement

काय आहे नेमकी योजना ? : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अल्प व अत्यल्प जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र शासनाने सुरू केलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना महाराष्ट्र राज्यात डिसेंबर २०१८ पासून राबवण्यास सुरुवात झाली. २ हेक्टर पर्यत शेती असणाऱ्या कुटुंबाला प्रती हप्ता रुपये २००० म्हणजेच वार्षिक ६००० अर्थसाह्य दिले जाते. या योजनेत पुढे केंद्र सरकारने बदल करून सरसकट सर्वांना या योजनेचा लाभ देण्याचे आदेश देण्यात आले. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेंतर्गत केंद्र शासनाने निकष शिथिल केल्याने लाभार्थी शेतकरी कुटुंबांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. शेतकरी कुटुंबासाठी दोन हेक्टरची मर्यादा रद्द केल्याने सरसकट शेतकरी कुटुंबे योजनेसाठी पात्र ठरली आहेत. (PM Kisan scheme details in Marathi mahiti)

Advertisement
Advertisement

Leave a Reply