Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Pune News: “म्हणून बिल्डरधार्जिन्या भाजप आमदार, नगरसेवकांची नागरिकांना दमदाटी..!”

Pune News: पुणे: गंगाधाम परिसरातील झोपडपट्टीतील नागरिकांना हुसकावून लावून ही जमीन बिल्डरच्या घशात घालण्याचा प्रयत्न भाजपचे (BJP) आमदार व नगरसेवकांनी सुरू केला आहे. गेल्या दोन चार दिवसापासून आमदार व नगरसेवक झोपडपट्टीत जाऊन दादागिरी करून नागरिकांना घर खाली करायला लावत असल्याने मार्गाने संतप्त भावना व्यक्त केले आहेत. या नागरिकांचे पुनर्वसन म्हणून अनधिकृतपणे डोंगरावर जागा दिली जात आहे. बिल्डरच्या फायद्यासाठी भाजपचे लोक सुपारी घेऊन हा उद्योग करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) केला आहे.

Advertisement

गंगाधाम चौक येथे आनंदनगर वसाहतीतील झोपडपट्टी पाडण्यासाठी भाजपचे आमदार (BJP MLA) व नगरसेवकांनी (BJP Correspondent)  धाक – दडपशाही केल्याचा प्रसंग दोन दिवसांपासून होत आहेत. येथील स्थानिक नागरिकांची आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी पदाधिकाऱ्यांसह पाहणी केली व नागरिकांच्या व्यथा जाणून घेतल्या. आनंदनगर झोपडपट्टीमध्ये सुरू असलेला प्रकार हा बिहार (Bihar) स्टाईल गुंडगिरीचा प्रकार आहे. निव्वळ कुठल्यातरी बिल्डरला फायदा व्हावा, या हेतूने ही झोपडपट्टी उठवण्याचा ठेकाच भाजपने घेतला असून दररोज त्यांचे नवनवीन प्रताप पाहायला मिळत आहेत. येथील रहिवाश्यांना पुनर्वसन करण्याचे आमिष दाखवत त्यांची फसवणूक करण्याचा हा सर्व प्रकार आहे. कारण यांना पुन्हा ज्या ठिकाणी पुनर्वसित केले जाणार आहे ती हिल – टॉप भागातील जागा देखील अनधिकृत असून त्या सदनिकांमध्ये स्थलांतर करण्यास स्थानिकांचा विरोध आहे. हा विरोध मोडून काढण्यासाठी स्थानिक भारतीय जनता पक्षाचे आमदार व नगरसेवकांनी जणू बिल्डर कडून सुपरीच घेतली आहे.

Loading...
Advertisement

दररोज हे आमदार व नगरसेवक दररोज येथील नागरिकांना दमदाटी करत जिवे मारण्याची धमकी देत आहेत,महिलांवर हात उचलत आहे. असे असूनही पोलीस प्रशासन काहीही कारवाई करायला तयार नाही.येथील नागरिकांसाठी पुणे महानगरपालिकेने बांधून दिलेले शौचालय देखील पडण्याचा प्रयत्न या बिल्डर कडून करण्यात आला आहे.राज्यात कायदा व सुव्यवस्थेचे राज्य असल्याचे चित्र पाहायला मिळत नाहीये कारण स्वतः लोकप्रतिनिधी अश्याप्रकारे कायदा हातात घेत आहेत, असा आरोप प्रशांत जगताप यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची याबाबत भूमिका स्पष्ट आहे, सर्वप्रथम या नागरिकांवर सुरू असणारी धाक दडपशाही बंद व्हावी ,या नागरिकांना संरक्षण मिळावे.या नागरिकांचे पुनर्वसन करायचे असल्यास त्यांना विश्वासात घेत अधिकृत जागेत त्यांचे पुनर्वसन करावे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शिष्टमंडळ पुणे पोलिस आयुक्त (Pune Police commissioner) व पुणे महानगरपालिका आयुक्त (Pune Municipal Commissioner) यांची सोमवारी भेट घेणार आहे. यवेळी प्रवक्ते प्रदीप देशमुख,मृणालिनी वाणी,संतोष नांगरे,प्रमोद गालिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement

Leave a Reply