Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Pune News: पुण्यावर आहे ‘त्यांचे’च राज्य..! पहा मनपाची कशी होतेय कृपा

पुणे (Pune News): शहरात (Pune) भटक्या कुत्र्यांचा (Dog) त्रास प्रचंड वाढलेला असताना या कुत्र्यांना पकडून त्यांची नसबंदी शस्त्रक्रिया करण्याचे काम अतिशय संथपणे सुरू आहे. गेल्या आठ महिन्यात केवळ २ हजार ९३१ कुत्र्यांना पकडण्यात आले आहे. सध्या केवळ दोन संस्था कार्यरत आहेत, आणखी तीन संस्थांची नियुक्ती केली असली तरी विविध विभागांच्या परवानग्यांमध्ये त्यांची मंजुरी अडकली आहे. त्यामुळे शहरातील रस्ते, गल्लीबोळांमध्ये भटक्या कुत्र्यांचेच राज्य आहे की काय अशी चर्चा आहे.

Advertisement

शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. महापालिकेने (Pune Municipal Corporation) २०१७ मध्ये केलेल्या सर्वेक्षणात २ लाख कुत्री आढळून आली होती. पण आता ही संख्या ३ लाखाच्या पुढे गेली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. महापालिकेने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, त्यांची नसबंदी करावी यासाठी शहरातील नागरिक, गृहनिर्माण सोसायट्या अनेकदा लेखी मागणी करतात, पण सर्वच तक्रारींची लगेच निरसन होत नाही. महापालिकेची कुत्री पकडणारी गाडी येण्यासाठी अनेक दिवस वाट पहावी लागते. भटक्या कुत्र्यांची दहशत शहरातील मोठ्या रस्त्यांसह गल्लीबोळात पुणेकर अनुभवत आहेत. अनेकदा तर दुचाकीचा पाठलाग करण्याच्या प्रकारांमुळे अनेक दुचाकीस्वार पडून अपघात झाला आहे. रस्त्याने चालत जाणाऱ्या नागरिकांचा चावा घेणे (Doge Bite), भुंकत अंगावर जाणे यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुलांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

Loading...
Advertisement

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे (health department) या भटक्या कुत्र्यांची शस्त्रक्रिया करून त्यांना पुन्हा मुळ ठिकाणी सोडले जाते. सध्या बाणेर (banner)आणि नायडू रुग्णालय येथे कुत्र्यांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी ‘डॉग पौंड’ उपलब्ध आहेत. हे शस्त्रक्रिया करण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी युनिव्हर्सल ॲनिमल वेल्फेअर सोसायटी, ॲनिमल वेल्फेअर असोसिएशन आणि पीपल फॉर एव्हॉयरमेंट ॲण्ड ॲनिमल्स या तीन संस्थांच्या कामाला स्थायी समितीने (standing Committee) नोव्हेंबर महिन्यात मान्यता दिली आहे. त्यांना प्रति शस्त्रक्रियेसाठी १६५० रुपये दिले जाणार आहेत. या संस्थांना काम सुरू करण्याचे आदेश दिले असले तरी त्यांना अद्याप ‘भारतीय प्राणी कल्याण मंडळा’ची (IWBI) परवानगी मिळाली नसल्याने त्यांचे काम ठप्प आहे.

Advertisement

मे २०२० ते मे २०२२ या कालावधीत ३६ हजार २३९ कुत्र्यांची नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. यंदा २०२२ पासून पुन्हा सीसीसी आणि युनिव्हर्सल या दोन संस्थांकडून भटक्या कुत्र्यांवर शस्त्रक्रिया केली जात असून, जानेवारी ते आॅगस्ट या कालावधी बाणेर व नायडू येथील पौंडमध्ये २ हजार ९३१ कुत्र्यांवर शस्त्रक्रिया केली आहे. ‘‘शहरातील भटक्या कुत्र्यांवर नसबंदी शस्त्रक्रिया करण्यासाठी सध्या दोन संस्था काम करत आहेत. आणखी तीन संस्थांची नियुक्त करण्यात आली असून, त्यांना ‘आयडब्लूबीआय’ची मंजुरी आणण्यासाठी चार महिन्यांची मुदत दिली आहे. या संस्थांची मान्यता आल्यानंतर या कामास आणखी गती येईल.’’ अशी माहिती डॉ. सारिका फुंडे (सहाय्यक पशुवैद्यकीय अधिकारी, पुणे महापालिका) यांनी दिली.

Advertisement
Advertisement

Leave a Reply