Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Economy News : मोदी सरकारसाठी खुशखबर; ‘त्या’ बाबतीत भारताने इंग्रजांच्या देशाला टाकले मागे

Economy News : केंद्रातील सत्ताधारी मोदी सरकारला खुशखबर मिळाली आहे. आर्थिक आघाडीवर ही चागंली बातमी मिळाली आहे. भारताने ब्रिटनला मागे टाकून जगातील 5 वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था  (India Became 5th Largest Economy In World) बनला आहे. यासह ब्रिटनची (Britain) सहाव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. एक दशकापूर्वी, भारत (India) सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये 11 व्या क्रमांकावर होता, तर ब्रिटन पाचव्या क्रमांकावर होता.

Advertisement

ब्रिटनच्या नव्या सरकारसाठी हा मोठा धक्का आहे. ब्रिटनमधील कंजर्व्हेटिव्ह पक्षाचे सदस्य बोरिस जॉन्सन () यांचा उत्तराधिकारी निवडतील. नव्या सरकारसमोर महागाई आणि सुस्त अर्थव्यवस्था हे सर्वात मोठे आव्हान असेल, असे मानले जात आहे. ही बातमी देखील महत्त्वाची आहे कारण अलीकडेच भारताने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचे अधिकृत GDP आकडे जाहीर केले आहेत. भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीडीपी वाढीचा दर 13.5 टक्के होता. जो गेल्या एका वर्षातील सर्वाधिक आहे. त्याच वेळी, भारताच्या जीडीपीमध्ये वार्षिक आधारावर देखील मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

Loading...
Advertisement

चीन (China) भारताच्या विकासाच्या जवळपासही नाही. एप्रिल ते जून या तिमाहीत चीनचा विकास दर 0.4 टक्के राहिला आहे. सर्व अंदाज सांगत आहेत की वार्षिक आधारावरही चीन भारताच्या तुलनेत मागे पडू शकतो. त्याचवेळी ब्रिटनबद्दल सांगितले तर आगामी काळात त्याच्या समस्या आणखी वाढू शकतात. नुकतेच, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) म्हटले आहे की भारताने यावर्षी वार्षिक आधारावर डॉलरच्या बाबतीत ब्रिटनला मागे टाकले आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply