Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Rain Alert : हवामान खात्याने ‘या’ जिल्ह्याला दिला अतिवृष्टीचा इशारा; नागरिकांनी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाव्या

Rain Alert : मागील काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने गणेशोत्सवात (Ganesh Festival 2022) जोरदार हजेरी लावली आहे. नगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस (Heavy Rain) होत आहे. काही मंडलात अतिवृष्टी झाली आहे. त्यात आता हवामान विभागाने 1 सप्टेंबर ते 3 सप्टेंबर दरम्यान अहमदनगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा (Heavy Rain Alert In Ahmednagar District) दिला आहे. या काळात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यास धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होऊन पर्यायाने नदीपात्रातील विसर्गातही वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठावरील गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिला आहे.

Advertisement

स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे नागरिकांनी पालन करावे. सखल परिसरात राहणार्‍या लोकांना तातडीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करावे. नदीकाठच्या नागरिकांना सावध रहावे. पाणी पातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी नदीपात्र, ओढे व नाल्यांपासून दूर रहावे. जुनाट व मोडकळीस आलेल्या इमारतींमध्ये आश्रय घेऊ नये. घाट रस्त्याने प्रवास करणे शक्यतो टाळावे. धरण व नदीक्षेत्रात पर्यटनासाठी जाणार्‍या लोकांनी विशेष काळजी घ्यावी. नदीच्या पाण्याच्या प्रवाहात उतरू नये. धोकादायक ठिकाणी सेल्फी (Selfie) काढू नये. मेघगर्जना होत असताना झाडांच्या खाली थांबू नये, सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. आपत्कालीन परिस्थितीत जवळचे तहसील कार्यालय, पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन प्राधिकरणाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केले आहे.

Loading...
Advertisement

नगर जिल्ह्यात (Ahmednagar District) मागील पंधरा दिवसांपासून पावसाने (Rain) विश्रांती घेतली होती. मात्र गणेशोत्सव सुरू होण्याच्या आदल्या दिवसापासून पावसाला सुरूवात झाली आहे. नगर शहराला तर पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. शहरात सतत पाऊस सुरू आहे. नगरप्रमाणेच उत्तर जिल्ह्यातील अकोले, श्रीरामपूर, कोपरगाव, संगमनेर, नेवासे या तालुक्यांत जोरदार पाऊस होत आहे. दक्षिण जिल्ह्यातील नगर तालुका, जामखेड, कर्जत, पारनेर, शेवगाव, श्रीगोंदा तालुक्यात काही ठिकाणी पाऊस पडला आहे. हवामानात बदल झाल्याने सर्दी, खोकला, ताप, थंडी या व्हायरल आजारांनी थैमान घातले आहे. शहरातील दवाखाने फुल्ल झाले आहेत. सध्या प्रत्येक घरात या व्हायरल आजारांचे पेशंट आहेत.

Advertisement
Advertisement

Leave a Reply