Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

China : .. तरीही चीनमध्ये ‘या’ शहरात 2 कोटी लोक घरात कैद; पहा, सरकारने का घेतला ‘हा’ निर्णय

China : आधीच्या तुलनेत कोरोनाची (Corona) भीती कमी झाली असेल, पण चीनमध्ये (Corona In China) अजूनही भीती कायम आहे. चीन सरकारने गुरुवारी एका मोठ्या शहरात संपूर्ण लॉकडाऊन (Lockdown) लागू केले. सुमारे 2.1 कोटी लोकसंख्या असलेल्या चेंगदू शहरात कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता हे कठोर पाऊल उचलण्यात आले आहे. चार दिवस लॉकडाऊन लावून चाचणी केली जाईल, असे सरकारचे म्हणणे आहे. शांघायमध्ये एक महिन्यासाठी असाच लॉकडाऊन लागू करण्यात आला होता.

Advertisement

चेंगदू ही दक्षिण-पश्चिम चीनमधील सिचुआन प्रांताची राजधानी आणि एक मोठे शहर आहे. बुधवारी येथे कोरोनाचे 106 नवीन रुग्ण आढळले, त्यापैकी 51 रुग्णांमध्ये लक्षणे आढळली नाहीत. शहरातील 381 अति जोखीम क्षेत्रे ओळखण्यात आली आहेत. ग्लोबल टाइम्सच्या (Global Times) रिपोर्टनुसार, लॉकडाऊनच्या काळात कुटुंबातील सदस्य दिवसातून एकदाच बाहेर जाऊ शकतो. तथापि, त्याच्याकडे निगेटिव्ह न्यूक्लिक चाचणी अहवाल देखील असणे आवश्यक आहे.

Loading...
Advertisement

सरकारने चार दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली असली तरी चार दिवसांनंतर हे निर्बंध हटवले जातील की नाही हे निश्चित झालेले नाही. ग्लोबल टाइम्सने आपल्या अहवालात म्हटले आहे की, येथील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. साथीचा रोग खूप वेगाने पसरत आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, चेंगदू येथून विमान कंपनीलाही निलंबित करण्यात आले आहे. इतर विमानतळांवरील अनेक उड्डाणेही रद्द करण्यात आली आहेत.

Advertisement

चीनमध्ये केवळ चेंगदूमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आलेला नाही तर इतरही अनेक ठिकाणी निर्बंध लादण्यात आले आहेत. शेनझेन आणि ग्वांगझूमध्येही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. ओमिक्रॉनच्या (Omicron) वेगाने होणाऱ्या प्रसारामुळे औद्योगिक घडामोडी प्रभावित झाल्याचे व्यापारी संघटनांचे म्हणणे आहे. विशेषतः उत्पादन क्षेत्राला मोठा फटका बसला आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply