Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Sri Lanka : आर्थिक संकटातील श्रीलंकेला मिळणार मोठी मदत; पहा, सरकारने काय केले ?

Sri Lanka : आर्थिक आणि राजकीय संकटाचा (Economic Crisis) सामना करत असलेल्या श्रीलंकेला (Sri Lanka) लवकरच काहीसा दिलासा मिळू शकतो. वृत्तानुसार, IMF च्या प्रतिनिधींसोबत झालेल्या चर्चेत श्रीलंकेने $ 2.9 अब्ज डॉलरच्या सशर्त मदत पॅकेजला सहमती दर्शवली आहे. श्रीलंकेतील परकीय चलनाचा साठा कमी झाल्यामुळे आयात थांबवण्यात आली. इथल्या लोकांनाही अन्न आणि पेट्रोल-डिझेलची मोठी कमतरता जाणवत होती.

Advertisement

श्रीलंकेवर 51 अब्ज डॉलरचे विदेशी कर्ज (Loan) आहे. जुलैमध्ये संतप्त आंदोलकांनी राष्ट्रपती भवनावर ताबा मिळवला होता. यानंतर माजी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे (Gotabaya Rajapaksa) देश सोडून पळून गेले. सिंगापूरमधूनच त्यांनी राजीनामा पाठवला होता. श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे (Ranil Wickremesinghe ) यांनी आयएमएफबरोबर सहमती दर्शवल्यानंतर देशाच्या इतिहासातील हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल असल्याचे म्हटले आहे.

Loading...
Advertisement

सुरुवातीला अडचणी येतील पण पुढे जाऊन प्रगती करायची आहे, असे ते म्हणाले. आमचा संकल्प काहीही असला तरी आता फक्त त्याचाच विचार करायचा आहे. आयएमएफच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, श्रीलंकेला संकटातून बाहेर काढण्यासाठी हा प्रयत्न केला जात आहे. आमचे शिष्टमंडळ श्रीलंकेसोबत आर्थिक सुधारणांबाबत चर्चा करेल, असे आयएमएफने याआधी सांगितले होते. प्रेस निवेदनानुसार, आयएमएफने म्हटले होते की कर्जाची स्थिरता पुनर्संचयित केली जाईल याची हमी हवी आहे. श्रीलंकेने मे महिन्यातच IMF कडून मदत पॅकेजबद्दल बोलण्यास सुरुवात केली होती, परंतु जूनमध्ये परिस्थिती गोंधळात पडल्याने चर्चा थांबली होती.

Advertisement

या मदत पॅकेजमुळे श्रीलंकेवरील कर्जाचा भार आधिक वाढणार आहे. मात्र, देशातील सध्याची परिस्थिती पाहता मदत पॅकेज मिळणेही अत्यंत आवश्यक होते. या पॅकेजच्या माध्यमातून आर्थिक संकटातून बाहेर पडण्यास सरकारला मदत मिळणार आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply