Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

MSEB : सावधान..! आता महावितरणचा राहणार वॉच; नुकसान भरून काढण्यासाठी घेतला ‘हा’ निर्णय

MSEB : महावितरणने (MSEB) होणारे नुकसान भरून काढण्यासाठी काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यानुसार सध्या 50 टक्क्यांपेक्षा अधिक वीजहानी (Electricity) असलेल्या वाहिन्यांवरील वीज गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी महावितरणने मोहीम हाती घेतली आहे. सध्या महावितरणच्या 16 परिमंडलातील 230 पेक्षा जास्त वाहिन्यांवर राबविण्यात येणार्‍या या मोहिमेत वीज चोरांविरुद्ध धडक कार्यवाही, नादुरुस्त मीटर बदलणे, एरियल केबल्स टाकणे, मल्टी मीटर बॉक्स बसविणे, कॅपॅसिटर बसविणे आणि वीजभाराचा समतोल राखणे इत्यादी कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे महावितरण आता आधिक सतर्क झाले आहे.

Advertisement

Loading...
Advertisement

महावितरणद्वारे राबविण्यात येत असलेल्या सुधारित वितरण क्षेत्र योजनेचे मुख्य उद्दीष्ट हे वीजहानी कमी करण्याचे असून त्या अनुषंगाने महावितरणने धडक मोहीम राबविण्याचे ठरवले आहे. वीजहानीची कारणे व त्यानुसार उपाययोजना राबिवण्यासाठी वीज वाहिन्यांचे मीटरिंग सुस्थितीत आणणे, स्वयंचलित पद्धतीने घेण्यात आलेले रीडिंग अपलोड करणे, ग्राहकाला ज्या वितरण रोहित्रावरून वीजपुरवठा करण्यात येतो तेच रोहित्र बिल प्रणालीमध्ये आहे किंवा नाही याची खातरजमा करणे, विजेची चोरी, अयोग्य मिटरिंग, अनधिकृत वीजपुरवठा किंवा वीज वाहिन्यावर असलेले आकडे, मीटर रीडिंगमधील त्रुटी, वीजबिलांमधील समस्या ही कारणे नुकसान वाढण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत.

Advertisement

वाणिज्यिक हानी कमी करण्यासाठी वीजचोरांविरुद्ध धडक मोहीम राबविण्यात येणार आहे. नादुरुस्त मीटर तातडीने बदलण्यात येतील. तसेच मीटर रीडिंग योग्य राहील याची दक्षता घेण्यात येईल व वीजखांबावर मीटर बॉक्स बसविण्याचे काम करण्यात येईल, असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Advertisement
Advertisement

Leave a Reply