Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Bank Holiday In September : सप्टेंबर महिन्यात ‘इतके’ दिवस बँका बंद; कामाचे नियोजन करण्याआधी चेक करा यादी

Bank Holiday In September: सप्टेंबर महिना गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवसाच्या सुट्टीने सुरू होत आहे. या महिन्यात देशात विविध ठिकाणी एकूण 13 दिवस बँका बंद राहतील. सुटीच्या सुट्ट्यांसह, त्यात दोन शनिवार आणि चार रविवारचाही समावेश आहे. तर गंगटोकमध्ये 9 ते 11 सप्टेंबर असे सलग 3 दिवस कोणतेही काम होणार नाही. 9 सप्टेंबर रोजी इंद्रजात्रा, 19 तारखेला दुसरा शनिवार आणि 11 तारखेला येथे बँका बंद राहतील. तसेच अन्य राज्यांतही काही ठराविक दिवशी बँकांना सुटी (Bank Holiday) राहणार आहे. त्यामुळे पुढील महिन्यात तुम्ही बँकेच्या कामाचे नियोजन करताना या सुट्ट्या कोणत्या दिवशी आहेत, याची माहिती करून घ्या. आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देणार आहोत.

Advertisement

Loading...
Advertisement

1 सप्टेंबर गणेश चतुर्थीचा दुसरा दिवस असल्याने गोवा राज्यातील पणजी विभागातील बँका बंद राहतील. 4 सप्टेंबर रविवार सर्वत्र सुटी आहे. 6 सप्टेंबर रांची विभागातील बँका बंद राहतील. 7 सप्टेंबर रोजी पहिला ओणम सणानिमित्त केरळ राज्यातील कोची आणि तिरुवनंतपुरम येथे बँकांना सुट्टी आहे. 8 सप्टेंबर तिरुओनमनिमित्त कोची आणि तिरुवनंतपुरम बँका बंद राहतील. 9 सप्टेंबर इंद्रजात्रानिमित्त गंगटोक (सिक्कीम) येथील बँका बंद राहणार आहेत. 10 सप्टेंबर दुसरा शनिवार सर्वत्र सुट्टी आहे. 11 सप्टेंबर रविवार सर्वत्र सुट्टी राहणार आहे. 18 सप्टेंबर रविवार सर्वत्र सुट्टी आहे. 21 सप्टेंबर कोची आणि तिरुवनंतपुरम, 24 सप्टेंबर रोजी चौथा शनिवार, 25 सप्टेंबर रविवार सर्वत्र सुट्टी तसेच 25 सप्टेंबर रोजी मणिपूर राज्यातील इम्फाळ आणि राजस्थानमधील जयपूर विभागातील बँका बंद राहतील.

Advertisement
Advertisement

Leave a Reply