Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

WHO Warning : कोरोनाबाबत ‘WHO’ ने दिला गंभीर इशारा; जाणून घ्या, कुठे होतोय बेजबाबदारपणा

WHO Warning : जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organisation) सांगितले की, कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे जगभरातील मृत्यूंमध्ये गेल्या आठवड्यात 15 टक्क्यांनी घट झाली आहे, तर संसर्गाची नवीन प्रकरणे पूर्वीपेक्षा नऊ टक्क्यांनी कमी नोंदली गेली आहेत. कोविड-19 (Covid 19) साथीच्या ताज्या साप्ताहिक मूल्यांकनात, संयुक्त राष्ट्रांच्या (United Nations) आरोग्य संस्थेने सांगितले की, गेल्या आठवड्यात जगभरात कोरोना (Corona) विषाणूच्या संसर्गाची 53 लाख प्रकरणे आढळली आहेत, तर 14,000 लोकांचा संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.

Advertisement

Loading...
Advertisement

जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, पश्चिम पॅसिफिक वगळता जगातील सर्व प्रदेशांमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाची नवीन प्रकरणे कमी होत आहेत. आफ्रिकेतील कोविडमुळे मृत्यू 183 टक्क्यांहून अधिक वाढले आहेत, तर युरोपमध्ये (Europe) ते सुमारे एक तृतीयांश (33 टक्के) आणि अमेरिकेत (America) 15 टक्क्यांनी कमी झाले आहेत.

Advertisement

असे असूनही, जागतिक आरोग्य संघटनेने इशारा दिला आहे, की कोविड-19 ची प्रकरणे पूर्णपणे नोंदली जात नाहीत कारण अनेक देशांनी त्यांची चाचणी कमी केली आहे आणि व्हायरसवर देखरेख ठेवण्यासाठी ‘प्रोटोकॉल’ पाळले जात नाहीत. त्यामुळे फार कमी प्रकरणे समोर येत आहेत. WHO ने म्हटले आहे, की सध्या संपूर्ण जगात संक्रमणाची सर्वाधिक प्रकरणे कोरोना व्हायरसच्या Omicron BA.5 प्रकारातील आहेत आणि जगभरातील संसर्गाच्या प्रकरणांमध्ये त्याचा वाटा सुमारे 70 टक्के आहे. गेल्या महिन्यात आलेल्या ‘जीनोम सिक्वेन्सिंग’च्या अहवालानुसार, जगातील 99 टक्के प्रकरणे ओमिक्रॉनच्या (Omicron) वेगवेगळ्या प्रकारांची आहेत. या आठवड्याच्या सुरुवातीला, फायझरने यूएस नियामक अधिकाऱ्यांना कंपनीच्या नवीन लसीला मान्यता देण्यास सांगितले जे ओमिक्रॉनच्या नवीन फॉर्म BA.4 आणि BA.5 पासून संरक्षण करते.

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply