Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

5G Network : देशातील या 13 शहरांत मिळणार 5G नेटवर्क; पहा, यादीत तुमचे शहर आहे का ?

5G Network : 5G चे व्यावसायिक प्रक्षेपण जाहीर करण्यात आले आहे. Airtel, Jio आणि Vodafone Idea देशात कधीही 5G लाँच (5G Network) करू शकतात. एअरटेल आणि जिओने सांगितले आहे, की त्यांची 5G सेवा ऑगस्ट महिन्यातच सुरू होईल. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या (Reliance Industries) वार्षिक बैठकीत या महिन्याच्या शेवटी Jio चे 5G लाँच केले जाण्याची शक्यता आहे. याशिवाय, असेही सांगितले जात आहे, की सरकार 29 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या इंडिया मोबाइल काँग्रेस (IMC) मध्ये 5G लाँच करण्याची अधिकृत घोषणा करू शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीही 5G अपेक्षेपेक्षा लवकर लाँच केले जाईल असे सांगितले आहे.

Advertisement

Loading...
Advertisement

अनेक रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात आहे, की 5G लाँच देशभरात एकाच वेळी होणार नाही आणि त्याचे कव्हरेज 4G इतकेही व्यापक नसेल. 5G हळूहळू वेगवेगळ्या टप्प्यात लाँच केले जाईल. पहिल्या टप्प्यासाठी, 13 शहरांची निवड करण्यात आली आहे जिथे 5G प्रथम लाँच केले जाईल. जाणून घ्या, या यादीत तुमचे शहर आहे की नाही. माहितीनुसार, अहमदाबाद, बंगलोर, चंदीगड, चेन्नई, दिल्ली, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, जामनगर, कोलकाता, लखनऊ, मुंबई, आणि पुणे या शहरांत सर्वात आधी 5G नेटवर्क लाँच होणार आहे.

Advertisement

आता याचा अर्थ असा आहे की या शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांना 5G अनुभवण्याची पहिली संधी मिळेल, जरी असे देखील होऊ शकते की 5G साठी थोडी प्रतीक्षा करावी लागेल. कारण, कोणत्याही कंपनीने 5G लाँच केले नाही. याबद्दल काहीही सांगितले गेले नाही. गेल्या आठवड्यात दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले होते की, सर्व दूरसंचार कंपन्यांना स्पेक्ट्रमशी संबंधित पत्रे देण्यात आली आहेत.

Advertisement
Advertisement

Leave a Reply