Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Foreign Reserve : देशाचे सोने वाढले पण, पैशांना बसला फटका; पहा, घडले तरी काय ?

Foreign Reserve : देशाच्या परकीय चलनाच्या साठ्यात (Foreign Reserve) पुन्हा घट झाली आहे. 5 ऑगस्ट 2022 रोजी संपलेल्या आठवड्यात ते 89.7 कोटी डॉलर घसरून $572.978 अब्ज झाले. या कालावधीत सोन्याच्या साठ्याचे मूल्य 67.1 कोटी डॉलरने वाढून $40.313 अब्ज झाले. रिजर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) शुक्रवारी जारी केलेल्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे.

Advertisement

रिजर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, 29 जुलै रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन साठा $2.315 अब्जने वाढून $573.875 अब्ज झाला होता. 22 जुलै 2022 रोजी संपलेल्या आठवड्यात ते $1.152 अब्जने घसरून $571.56 अब्ज झाले होते.

Advertisement

Loading...
Advertisement

आरबीआयने शुक्रवारी जारी केलेल्या साप्ताहिक आकडेवारीनुसार, 5 ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन साठ्यात झालेली ही घसरण मुख्यत्वे विदेशी चलन मालमत्तेत घट झाल्यामुळे झाली आहे, जी एकूण चलन साठ्याचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. रिजव्‍‌र्ह बँकेने सांगितले की, अहवाल आठवड्यात परकीय चलन मालमत्ता $ 1.611 अब्ज डॉलरने घसरून $ 509.646 अब्ज झाला आहे. डॉलरमध्ये व्यक्त केलेल्या परकीय चलनाच्या साठ्यामध्ये असलेल्या युरो, पौंड आणि येन सारख्या इतर विदेशी चलनांच्या मूल्यात वाढ किंवा घट होण्याचा प्रभाव देखील समाविष्ट असतो.

Advertisement

आकडेवारीनुसार, या कालावधीत सोन्याच्या साठ्याचे (Gold Reserve) मूल्य 67.1 कोटी डॉलरने वाढून $ 40.313 अब्ज झाले आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) मध्ये देशाचा SDR (Special Drawing Rights) $4.6 कोटी डॉलरने वाढून $18.031 अब्ज झाला आहे. IMF मध्ये ठेवलेला देशाचा चलन साठा 30 लाख डॉलरने कमी होऊन $ 4.987 अब्ज राहिला असल्याचे सांगण्यात आले. मागील काही दिवसांपासून परकीय चलन साठा सातत्याने कमी जास्त होत आहे. कधी यामध्ये वाढ तर कधी घट होत आहे.

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply