Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Cricket : झिम्बाब्वे दौऱ्यासाठी ‘हा’ माजी खेळाडू टीम इंडियाचा प्रशिक्षक; राहुल द्रविडला ब्रेक..

Cricket : राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) हे आगामी झिम्बाब्वे (Zimbabwe) दौऱ्यासाठी भारताचे कार्यकारी मुख्य प्रशिक्षक असतील. कारण 27 ऑगस्टपासून यूएईमध्ये (UAE) खेळल्या जाणाऱ्या आशिया चषक (Asia Cup) आणि या मालिकेत फारच कमी वेळ आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह (Jay Shah) यांनी शुक्रवारी ही माहिती दिली.

Advertisement

Loading...
Advertisement

जय शाह यांनी पीटीआयला सांगितले, की “होय, लक्ष्मण झिम्बाब्वे दौऱ्यावर खेळल्या जाणार्‍या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी संघाची जबाबदारी (Coach) घेईल. राहुल द्रविडला (Rahul Dravid) विश्रांती दिली जात आहे असे नाही. झिम्बाब्वेमधील एकदिवसीय मालिका 22 ऑगस्ट रोजी संपेल आणि द्रविडसह भारतीय संघ 23 ऑगस्ट रोजी यूएईला रवाना होईल. या दोन स्पर्धांमध्ये फार कमी वेळ आहे, त्यामुळे लक्ष्मण झिम्बाब्वेमध्ये भारतीय संघाची धुरा सांभाळणार आहे.

Advertisement

ते म्हणाले, की ”आशिया कप टी-20 स्पर्धेतील केवळ लोकेश राहुल आणि दीपक हुडा हे झिम्बाब्वे दौऱ्यासाठी वनडे संघात आहेत. त्यामुळे मुख्य प्रशिक्षक टी-20 संघासोबत असेल हे तर्कसंगत आहे. 18, 20 आणि 22 ऑगस्ट रोजी झिम्बाब्वेतील हरारे येथे तीन एकदिवसीय सामने आयोजित केले आहे. लोकेश राहुल आणि हुड्डा हरारेहून दुबईला जाणार असल्याचेही शाह यांनी सांगितले. बीसीसीआयमध्ये अशी परंपरा आहे की जेव्हा मुख्य संघ दौर्‍यावर असतो तेव्हा द्वितीय श्रेणी संघांची जबाबदारी नेहमी एनसीएच्या प्रमुखाकडे असते.

Advertisement
Advertisement

Leave a Reply