Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Inflation Report : आलाय किरकोळ महागाईचा अहवाल; पहा, देशात महागाई घटली की वाढली ?

Inflation Report : महागाईच्या आघाडीवर जूनच्या तुलनेत जुलैमध्ये सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. भारतातील किरकोळ महागाई (Retail Inflation) जुलैमध्ये 6.71% पर्यंत घसरली आहे. यापूर्वी जूनमध्ये किरकोळ चलनवाढ 7.01 टक्के होती. तथापि, हा सलग सातवा महिना आहे की महागाईचा दर भारतीय रिजर्व्ह बँकेच्या (RBI) 4-6% च्या मर्यादेपेक्षा जास्त आहे. शुक्रवारी सरकारने ही आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार जुलैमध्ये खाद्यपदार्थांच्या किमती घसरल्याने महागाईपासून काहीसा दिलासा मिळाला आहे. किरकोळ महागाईचा दर जानेवारीमध्ये 6.01%, फेब्रुवारीमध्ये 6.07%, मार्चमध्ये 6.95%, एप्रिलमध्ये 7.79% आणि मेमध्ये 7.04% आणि जूनमध्ये 7.01% नोंदवला गेला.

Advertisement

Loading...
Advertisement

आकडेवारीनुसार, अन्नधान्य चलनवाढीचा दर जून महिन्यात 7.75% होता, जुलै 2022 मध्ये 6.75% वर आला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांत किरकोळ महागाई 7% च्या वर गेली आहे. दरम्यान, औद्योगिक उत्पादन (IIP) जून महिन्यात 12.3% पर्यंत घसरले, जे मे मध्ये 19.6% नोंदवले गेले होते. जून 2022 मध्ये उत्पादन क्षेत्रातील उत्पादनात 12.5% ​​वाढ झाली आहे. खाण उत्पादन 7.5% पर्यंत वाढले आहे.

Advertisement

महागाईच्या दरात काहीशी घसरण झाली असली तरी देशात महागाई वाढलेलीच आहे. इंधनाच्या किंमती, गॅसच्या किंमतीनी तर लोक अक्षरशः हैराण झाले आहेत. ही महागाई कमी करण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न होत आहेत. मात्र त्यांचा फारसा उपयोग होत नाही. कधी नव्हे ते घरगुती गॅस टाकीचे दर एक हजार रुपयांच्या पुढे गेले आहेत. पेट्रोलही शंभर रुपयांपेक्षा जास्त किंमतीने विकले जात आहे. सहाजिकच या इंधनाच्या वाढलेल्या किंमतीनी देशांतर्गत महागाई वाढण्यास हातभार लावल आहे. या महागाईने सर्वसामान्य आणि गरीब वर्गातील लोकांना मात्र अगदीच हैराण केले आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply