Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Rain : राज्यात पुढील चार दिवस जोरदार पाऊस.. हवामान खात्याने ‘या’ जिल्ह्यांना दिला इशारा

Rain : मागील काही दिवसांपासून जोरदार बरसत असलेल्या पावसाने (Rain) विश्रांती घेतली आहे. दोन दिवसांपासून राज्यात फारसा पाऊस पडलेला नाही. मात्र, असे असले तरी हवामान खात्याने पुन्हा जोरदार पावसाचा (Heavy Rain) इशारा दिला आहे. राज्यात पुढील चार दिवस पुणे, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात येलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. तर नांदेड जिल्ह्यात पुढील 24 तासांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. विदर्भातीलही काही जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Advertisement

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार 11 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात येलो अलर्ट असणार आहे. तर कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यात तुरळक पावसाची शक्यता आहे. विदर्भात 13 आणि 14 ऑगस्ट रोजी पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ही स्थिती निर्माण झाल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

Advertisement

Loading...
Advertisement

राज्यातील पाऊस कमी झाला असून केवळ काही भागांतच हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने हजेरी लावली होती.

Advertisement

सध्या बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा आता कमकुवत झाला आहे. तर सौराष्ट्र ते केरळच्या किनारी भागापर्यंत द्रोणीय स्थिती आहे. मात्र त्याचा प्रभाव फक्त किनारी भागात आहे. त्यामुळे सध्या राज्यातील पाऊस कमी झाला असून फारसा कुठे पाऊस पडलेला दिसत नाही. राज्यात रत्नागिरी, पुणे, सातारा, वर्धा, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर या जिल्ह्यांसाठी हवामान खात्याने इशारा दिला आहे.

Advertisement

दरम्यान, राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडला आहे.  या पावसाचा पिकांनाही फटका बसला आहे. काही ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे तर काही ठिकाणची  पिके संकटात सापडली आहेत. या परिस्थितीवर सरकारही लक्ष ठेऊन आहे. ज्या ठिकाणी पिकांचे नुकसान आहे तसेच ज्या ठिकाणी नुकसान होण्याची शक्यता आहे,  तेथील आढावा घेण्यास कृषी विभागााने सुरुवात केल्याची माहिती आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply