Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

North Korea : आश्चर्यच म्हणायचे..! किम जोंगच्या देशाने केली कोरोनाबाबत ‘ही’ मोठी घोषणा; जाणून घ्या..

North Korea : जगातील एकाही देशाला अद्याप कोरोनावर मात करता आलेली नाही. असे असताना उत्तर कोरियाने मात्र या घातक आजारावर नियंत्रण मिळविल्याची घोषणा केली आहे. उत्तर कोरियाचे (North Korea) नेते किम जोंग उन (Kim Jong Un) यांनी गुरुवारी जागतिक साथीच्या कोविड-19 वर संपूर्ण नियंत्रणाची घोषणा करताना सांगितले की, सार्वजनिक आरोग्याच्या इतिहासात देशाच्या यशाची नोंद केली जाईल. उत्तर कोरियामध्ये या कोरोना साथीच्या उद्रेकासाठी त्यांनी शेजारील दक्षिण कोरियाला (South Korea) जबाबदार धरले. यासोबतच याविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

Advertisement

Loading...
Advertisement

काही तज्ञांचा असा विश्वास आहे की वाढत्या आर्थिक अडचणींमध्ये किमला देशावर नियंत्रण ठेवण्यास मदत करण्यासाठी उत्तर कोरियाने (North Korea) कोरोना उद्रेक कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचा असा विश्वास आहे की जागतिक महामारीवर मात करण्याच्या किमच्या घोषणेचा उद्देश आता इतर गोष्टींकडे लक्ष वेधणे हा आहे. दक्षिण कोरियाच्या एकीकरण मंत्रालयाने याचा निषेध केला आणि उत्तर कोरियाच्या “अत्यंत अपमानास्पद आणि धमकावणाऱ्या टिप्पण्यांबद्दल” मनापासून खेद व्यक्त केला. मे महिन्यात, उत्तर कोरियाने देशात कोरोना विषाणू (Corona Virus) संसर्गाच्या ‘ओमिक्रॉन’ (Omicron) प्रकाराच्या प्रकरणांची खाञी केली. २.६ कोटी लोकसंख्या असलेल्या देशात ४८ लाख ‘तापाचे रुग्ण’ असल्याची माहिती त्यांनी दिली होती. त्यांनी खाञी केली आहे की केवळ 74 लोकांचा मृत्यू झाला आहे.

Advertisement

KCNA नुसार, बुधवारी त्यांच्या भाषणात किम म्हणाले की, ‘आम्ही महामारीविरूद्ध अत्यंत आपत्कालीन उपायांचा अवलंब करण्याची मोहीम सुरू केली तेव्हापासून ते सतत कमी होत गेले आणि 29 जुलैपासून, एकही रुग्ण नाही.

Advertisement
Advertisement

Leave a Reply