Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Life Insurance : जीवन विमा कंपन्यांची चांदीच.. ‘त्यामुळे’ फक्त एकाच महिन्यात मिळाले ‘इतके’ पैसे

Life Insurance : नवीन विम्यामधून (Insurance) जीवन विमा कंपन्यांना मिळणारा प्रीमियम जुलैमध्ये 91 टक्क्यांनी वाढला आहे. विमा नियामक IRDAI च्या आकडेवारीनुसार, जीवन विमा कंपन्यांना गेल्या महिन्यात नवीन प्रीमियम (Premium) म्हणून 39,078.91 कोटी रुपये मिळाले आहेत. मागील वर्षी याच कालावधीत सर्व 24 आयुर्विमा कंपन्यांना नवीन प्रीमियम म्हणून 20,434.72 कोटी रुपये मिळाले होते.

Advertisement

Loading...
Advertisement

देशातील सर्वात मोठी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (LIC) ने जुलैमध्ये नवीन प्रीमियममधून उत्पन्न दुप्पट करून 29,116.68 कोटी रुपये केले आहे. जुलै 2021 मध्ये, LIC ला नवीन प्रीमियम म्हणून 12,030.93 कोटी रुपये मिळाले होते. जीवन विमा बाजारात LIC चा 68.6 टक्के हिस्सा आहे. इतर 23 विमा कंपन्यांच्या नवीन प्रीमियम महसलात एकत्रितपणे 19 टक्के वाढ झाली आहे आणि त्यांना 9,962.22 कोटी रुपयांचा प्रीमियम प्राप्त झाला आहे. जुलै 2021 मध्ये, या 23 कंपन्यांना नवीन प्रीमियम म्हणून 8,403.79 कोटी रुपये मिळाले होते.

Advertisement

आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष 2022-23 च्या पहिल्या चार महिन्यांत (एप्रिल-जुलै) सर्व कंपन्यांचा नवीन प्रीमियम महसूल 54 टक्क्यांनी वाढून 1,12,753.43 कोटी रुपये झाला आहे. वर्षभरापूर्वी याच कालावधीत सर्व कंपन्यांना नवीन प्रीमियम म्हणून 73,159.98 कोटी रुपये मिळाले होते. LIC चा नवीन प्रीमियम महसूल चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांत (एप्रिल-जुलै) 62 टक्क्यांनी वाढून 77,317.69 कोटी रुपये झाला आहे. इतर आयुर्विमा कंपन्यांना (Life Insurance Companies) या कालावधीत नवीन प्रीमियम म्हणून रु. 35,435.75 कोटी प्राप्त झाले असून त्यात 39 टक्क्यांची वाढ झाली आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply