Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Clean City : आता सरकारनेच घेतलयं मनावर.. शहर स्वच्छ करण्यासाठी घेतला ‘हा’ निर्णय..

Clean City : शहर स्वच्छ (Clean City) व सुंदर करण्यासाठी सरकारी पातळीवर अनेक प्रयत्न केले गेेले. यासाठी कोट्यावधी रुपयेही खर्च केले गेले. मात्र, तरीही शहरांची सध्याची परिस्थिती समोर आहे. त्यामुळे आता नगरविकास विभागाने शहरांच्या स्वच्छतेवर भर देण्याचा निर्णय घेतला असून शहर सौंदर्यीकरण अभियान  हाती घेतले आहे. या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी शहराच्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत कार्यगटाची स्थापना करण्याच्या सूचना विभागाने दिल्या आहेत. यामध्ये आयुक्त किंवा मुख्याधिकारी, शहर अभियंता, नगररचनाकार, स्वच्छता संबंधित अधिकारी यांसह काही निमंत्रित व विशेष निमंत्रित सदस्य यांचा समावेश राहिल, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

Advertisement

Loading...
Advertisement

शहरातील अस्वच्छ ठिकाणे निश्‍चित करून येथे स्वच्छता अभियान (Clean City Campaign) राबवावे. शहरातील मध्यवर्ती चौकांचे सुशोभिकरण करावे. शहरात योग्य ठिकाणी वाहतूक बेट तयार करावे. शहरातील रस्ता दुभाजकांची (Road Divider) स्वच्छता करावी. दुभाजकांवर विविध प्रजातींचे वृक्ष लागवड करावी. तलाव, विहीर, जलाशये सुशोभिकरण करावे. शहरांमध्ये आकर्षक सेल्फी पॉइंटची (Selfie Point) निर्मिती करून शहराचे सुशोभिकरण करता येईल.

Advertisement

शहराचे सुशोभिकरण करताना स्थानिक लोकप्रतिनिधींचे मार्गदर्शन विचारात घ्यावे. तसेच या कामात त्यांचाही सहभाग घेण्याचा प्रयत्न करावा. सौंदर्यीकरण अभियानात प्लास्टिकचा (Plastic) वापर होणार नाही, याची काळजी घ्यावी. यासाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्याकडील स्वनिधी खर्च करता येईल, असे विभागाने स्पष्ट केले आहे. अभियान राबविताना शहराची नव्याने ओळख निर्माण करण्यासाठी शहराचे ब्रँडींग करता येईल. शहराच्या सुशोभिकरण व देखभालीसाठी खाजगी संस्थांची मदत घेता येईल. सीएसआर निधी व लोकसहभागातून शहर सौंदर्यीकरणाची कामे करता येतील.

Advertisement
Advertisement

Leave a Reply