Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Russia-Ukraine War : रशियाच्या ‘त्या’ कारनाम्यामुळे जग संकटात; पहा, नेमके काय घडले युद्ध मैदानात..

Please wait..

Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेन यांच्यातील कराराच्या वृत्तानंतर धान्य संकटातून सुटका होण्याची चिन्हे दिसू लागली होती. मात्र, रशियाने ओडेसा बंदरावर क्रूझ क्षेपणास्त्र डागल्यानंतर परिस्थिती पुन्हा बदलली आहे. जगातील अनेक बाजारपेठेतील किमतींमध्ये प्रचंड वाढ झाली. नुकत्याच झालेल्या करारात काळ्या समुद्रातून युक्रेनमध्ये अडकलेल्या धान्याची निर्यात करण्यास परवानगी देण्याचे म्हटले होते. या करारात संयुक्त राष्ट्र (United Nations) आणि तुर्कीनेही महत्त्वाची भूमिका बजावली होती.

Advertisement

Advertisement

शिकागोमधील फ्युचर्स मार्केटमधील किमती 4.6 टक्क्यांपर्यंत वाढल्याचा अहवाल आहे. विशेष म्हणजे, ओडेसासह तीन बंदरांतून माल पाठवण्याची परवानगी दिल्यानंतर शुक्रवारी किंमती सुमारे 6 टक्क्यांनी घसरल्या होत्या. रशियाच्या (Russia) आक्रमणानंतर प्रमुख बंदरे बंद झाल्यामुळे युक्रेनमध्ये (Ukraine) लाखो टन धान्य (Grain) अडकले आहे. येथे, मध्य पूर्व आणि उत्तर अमेरिकेतील मोठ्या ग्राहकांना रस्ते आणि रेल्वे मार्गे लहान प्रमाणात पाठवले गेले आहे. विशेष म्हणजे, युक्रेन आणि रशियामधील बिघडलेल्या परिस्थितीमुळे या देशांनाही पुरवठ्यासाठी इतर ठिकाणे शोधणे भाग पडले आहे.

Advertisement

Advertisement
Loading...

या प्रकरणाची माहिती असलेल्या एका व्यक्तीने सांगितले, की ओडेसा बंदरात नऊ जहाजे उपस्थित होती. त्यापैकी चारमध्ये $ 45.6 दशलक्ष किमतीचे धान्य होते. धान्याची वाहतूक करणारी जहाजे माल्टा, लायबेरिया, सिएरा लिओन आणि पनामा येथे जात असल्याची माहिती त्यांनी दिली.

Advertisement

युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (volodymyr zelensky) यांचे उप कर्मचारी प्रमुख आंद्रे सिबिहा यांनी कागदपत्रांच्या प्रती सोशल मीडियावर पोस्ट केल्या होत्या. या अंतर्गत करारात सहभागी असलेल्या दोन्ही पक्षांना धान्याशी संबंधित व्यापारात जहाजांवर किंवा बंदरांवर हमला करू नये, असे सांगण्यात आले होते. मात्र, त्याचा काही परिणाम होत असल्याचे दिसत नाही. रशियाच्या या नव्या कारनाम्यामुळे पुन्हा जगातील अन्नधान्याचा पुरवठा संकटात सापडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply