Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Airtel New Recharge Plan : एअरटेलने आणलेत चार जबरदस्त प्लान; पहा, काय मिळतात फायदे..

Please wait..

Airtel : एअरटेलने चार नवीन प्लान लाँच (Airtel New Recharge Plan) केले आहेत. यामध्ये दोन दर-कपात आणि दोन स्मार्ट रिचार्ज. या चार रिचार्ज प्लानपैकी दोन नवीन स्मार्ट रिचार्ज (Smart Recharge) पर्याय आहेत. सर्व नवीन लाँच केलेल्या रेट कटर प्लानची ​​किंमत 140 रुपयांपेक्षा कमी आहे. सर्वात कमी किंमतीचा प्लान 109 रुपयांचा आहे, तर सर्वात जास्त 131 रुपये किंमतीचा प्लान आहे. ज्यांना कमी खर्च करून आपला नंबर सुरू ठेवायचा आहे त्यांच्यासाठी हे प्लान चांगले आहेत. 109 आणि 111 रुपयांचा प्लान सध्याच्या 99 च्या प्लानपेक्षा अधिक वैधता (Validity) आणि डेटा (Internet Data) देतात. एअरटेलच्या या नवीन योजनांबाबत आधिक माहिती जाणून घेऊ या..

Advertisement

एअरटेलच्या 109 रुपयांच्या प्लानचे फायदे
एअरटेलचा 109 रुपयांचा रेट कटर प्लान 30 दिवसांची वैधता देतो. हे 200MB मोबाइल डेटा आणि 99 रुपयांच्या टॉक-टाइमसह येते. लोकल, एसटीडी व्हॉइस कॉलसाठी प्रति सेकंद 2.5 पैसे द्यावे लागतील. एसएमएससाठी, 1 रुपये प्रति स्थानिक एसएमएस आणि 1.44 रुपये प्रति एसटीडी एसएमएस भरावे लागतील.

Advertisement

Advertisement

एअरटेल 111 रुपयांच्या प्लानचे फायदे
Airtel 111 रुपयांचा स्मार्ट रिचार्ज 99 रुपये टॉकटाइम आणि 200 MB मोबाइल डेटा मिळवून देतो. हे एका महिन्याच्या वैधतेसह येते, या प्लानमध्ये लोकल-एसटीडी कॉलची किंमत 2.5 रुपये प्रति सेकंद असेल. स्थानिक एसएमएस 1 रुपये आणि एसटीडी 1.5 प्रति एसएमएस असेल.

Advertisement
Loading...

एअरटेलच्या 128 रुपयांच्या प्लानचे फायदे
128 रुपयांचा एअरटेल प्लान 30 दिवसांसाठी वैध आहे. स्थानिक आणि एसटीडी कॉलसाठी प्रति सेकंद 2.5 रुपये आणि अन्य कॉलसाठी 5 रुपये प्रति सेकंद शुल्क आकारले जाईल. वापरलेल्या डेटासाठी रुपये 0.50/MB शुल्क आकारले जाते.

Advertisement

Advertisement

एअरटेलच्या 131 रुपयांच्या प्लानचे फायदे
एअरटेल 131 रुपयांचा पॅक एका महिन्यासाठी वैध आहे. स्थानिक आणि एसटीडी कॉलसाठी प्रति सेकंद 2.5 रुपये आणि अन्य कॉलसाठी प्रति सेकंद 5 रुपये आकारले जातात. स्थानिक एसएमएसची किंमत 1 रुपये आणि एसटीडीची किंमत प्रति एसएमएस 1.5 रुपये आहे. तसेच प्रति एमबी डेटा 0.50 रुपये आकारले जातात.

Advertisement

Vodafone Idea Recharge Plan : Jio आणि Airtel कडे सुद्धा नाही ‘हा’ खास प्लान; पहा, काय आहेत फायदे..

Advertisement
Advertisement

Leave a Reply