Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

वाव.. फक्त एकाच महिन्यात 7 हजार इलेक्ट्रिक स्कूटर विक्री; पहा, कोणत्या कंपनीने केलीय ‘ही’ कमाल..

दिल्ली : देशात आता हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांना मागणी वाढत चालली आहे. ओला इलेक्ट्रिकने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये इलेक्ट्रिक टू-व्हीलर सेगमेंटमध्ये प्रवेश केला आणि डिसेंबर 2021 मध्ये स्कूटरचे वितरण सुरू केले. इलेक्ट्रिक स्कूटर मार्केटमध्ये या स्कूटरला मागणी खूप जास्त आहे, म्हणूनच कंपनीने गेल्या महिन्यात फेब्रुवारी 2022 मध्ये 7 हजार इलेक्ट्रिक स्कूटर्सची विक्री केली. यापैकी 4,000 स्कूटर्स वाहन पोर्टलवर नोंदणीकृत आहेत, तर उर्वरित युनिट्सची सध्या तात्पुरती नोंदणी सुरू आहे.

Advertisement

काही अहवालांनुसार, Ola ने गेल्या महिन्यात विक्रीच्या बाबतीत Ather 450X सारख्या इतर प्रतिस्पर्ध्यांना मोठ्या फरकाने मागे टाकले आहे. ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी ट्विटरवर ही माहिती दिली आणि हे देखील सांगितले, की ओला इलेक्ट्रिक या महिन्यात देशात 15,000 इलेक्ट्रिक स्कूटर विकण्याचे लक्ष्य ठेवत आहे. Ola इलेक्ट्रिक स्कूटर्स सध्या फक्त बुकिंगसाठी उपलब्ध आहेत परंतु खरेदी सुद्धा लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यापर्यंत कंपनी खरेदीबाबत निर्णय घेऊ शकते, असा अंदाज आहे.

Advertisement

Ola देशात 2 प्रकारात Ola S1 आणि Ola S2 Pro उपलब्ध आहे. Ola S1 Pro मध्ये 3.97 kWh बॅटरी पॅक आहे, जो 11 bhp पॉवर आणि 58 Nm पीक टॉर्क जनरेट करतो. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये नॉर्मल, स्पोर्ट आणि हायपर असे तीन रायडिंग मोड आहेत. ओले इलेक्ट्रिकला एका चार्जवर 181 किमी पर्यंत राइडिंग रेंज असल्याचा दावा केला जातो. Ola S1 115 किमी प्रति तास या वेगाने पोहोचण्यास सक्षम आहे. ही स्कूटर केवळ 3 सेकंदात 0 ते 40 किलोमीटर वेगात वाढ करू शकते.

Loading...
Advertisement

दरम्यान, देशातील सेमी कंडक्टरच्या कमतरतेमुळे ऑटोमोबाइल क्षेत्र आधीच अडचणीत आहे. त्यानंतर रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे हे संकट आणखी वाढले आहे. आता त्याचा परिणाम दिसून येत आहे. सियामच्या अहवालानुसार, फेब्रुवारी महिना वाहन उद्योगासाठी वाईट ठरला आहे. प्रवासी वाहनांच्या विक्रीत सहा टक्क्यांनी घट झाली असली तरी या काळात दुचाकींच्या विक्रीत तब्बल 27 टक्क्यांनी घट झाली आहे.

Advertisement

ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन सियामच्या अहवालानुसार, कारखान्यांकडून डीलर्सना वाहनांचा पुरवठा फेब्रुवारी 2022 मध्ये 23 टक्क्यांनी घटला आहे. त्यात म्हटले आहे की, प्रवासी वाहने, दुचाकी आणि तीन चाकी वाहनांची एकूण घाऊक विक्री फेब्रुवारी 2022 मध्ये 13,28,027 युनिट्सवर होती, जी मागील वर्षाच्या याच कालावधीतील 17,35,909 युनिट्सच्या तुलनेत 23 टक्क्यांनी घसरली आहे. अहवालानुसार, फेब्रुवारीमध्ये वाहनांच्या एकूण विक्रीत 17.8 टक्क्यांची घट झाली आहे. या महिन्यात एकूण 17.91 लाख वाहनांची विक्री झाली. तर फेब्रुवारी 2021 मध्ये एकूण 21.77 लाख वाहनांची विक्री झाली.

Advertisement

वाव.. फक्त अडीच तासात फुल चार्ज..! आलीय एकदम हटके इलेक्ट्रिक स्कूटर; पहा, काय आहेत खास फिचर..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply