Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

अर्र.. चीन-पाकिस्तान ‘तिथे’ ठरलेत सपशेल अपयशी; तालिबानबाबत ‘तो’ प्रस्ताव अखेर रद्द

नवी दिल्ली : अफगाणिस्तान मध्ये आता तालिबानी राजवट असली तरी त्यास बहुतांश देशांनी मान्यता दिलेली नाही. अमेरिकेसह अन्य मोठ्या देशांनी तालिबानला मान्यता देण्यासाठी चीन आणि पाकिस्तान प्रयत्न करत आहेत. आता तर या देशांनी थेट संयुक्त राष्ट्रसंघातच तालिबानची शिफारस केली. मात्र, या दोन्ही मुजोर देशांचा डाव अन्य देशांनी हाणून पाडला आहे. तालिबान सरकारला संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत प्रतिनिधीत्व मिळावे, यासाठी चीन आणि पाकिस्तान प्रयत्न करत होते. मात्र, यामध्ये त्यांना यश मिळाले नाही.

Advertisement

तालिबानने अफगाणिस्तान मध्ये सरकार गठीत केले आहे. त्यामुळे तालिबानला प्रतिनिधीत्व द्यावे, असा या देशांचा प्रस्ताव होता. हा प्रस्ताव मान्य होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र, या प्रस्तावास जोरदार विरोध होण्याची शक्यता होती. चीन आणि पाकिस्तानचा नेमका काय डाव आहे, हे ही सर्वांना चांगलेच लक्षात आले. तालिबानला जर महासभेत प्रतिनिधीत्व दिले तर अनेक पाश्चिमात्य देश त्यास विरोध करतील, अशी भिती संयुक्त राष्ट्रसंघाला वाटत होती. त्यामुळे त्यांनी हा निर्णय सध्या प्रलंबित ठेवला आहे. त्यामुळे महासभेत अमेरिका पुरस्कृत सरकारचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी हेच सध्या अफगाणिस्तानचे प्रतिनिधी आहेत.

Advertisement

अफगाणिस्तान मध्ये सध्या तालिबानी राजवट आहे. मात्र, या सरकारला जगातील मोठ्या देशांनी अद्याप मान्यता दिलेली नाही. अफगाणिस्तान बाबत सर्वांनीच तटस्थ धोरण स्वीकारले आहे. या देशात घडणाऱ्या घडामोडींकडे मात्र अमेरिकेसह सर्व देशांचे बारकाईने लक्ष आहे. तसेच चीन आणि पाकिस्तानच्या कारवायांकडेही नजर आहे. कारण, आजमितीस हे दोन्ही देश तालिबानचे राजरोसपणे समर्थन करत आहेत.

Loading...
Advertisement

तालिबान्यांच्या कारवाया माहित असतानाही चीन-पाकिस्तानने तालिबानला पाठिंबा देण्याचे धोरण घेतले आहे. यामागे दोघांचा काय उद्देश आहे, याचा अंदाज दुसऱ्या देशांना आहेच. त्यामुळेच जागतिक पातळीवर चीन-पाकिस्तान तालिबानचे समर्थन करतील, याचाही अंदाज होताच. या मुद्द्यावर जगातील सर्वच देश सतर्क आहेत. त्यामुळे चीन आणि पाकिस्तानचे डावही अपयशी ठरताना दिसत आहेत.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply