Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

अटकेपार झेंडा..! पुण्याच्या मराठी मुलीची अमेरिकेतील शेअर बाजारात धमाल, पाहा नेमकं काय केलं..?

नवी दिल्ली : मराठी माणसाने अटकेपार झेंडे रोवल्याचे आपण नेहमीच बोलतो. मराठी माणसाने विविध क्षेत्रे पादाक्रांत करताना आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. हे सर्व सांगण्याचे कारण म्हणजे, पुण्याच्या मराठी मुलीने अमेरिकेतील शेअर बाजारात कमाल केली आहे. या मराठी मुलीचे नाव आहे, नेहा नारखेडे..!

Advertisement

पुण्यात वाढलेली नेहा कुठलीही पार्श्वभूमी नसताना, अमेरिकेत शिकायला गेली. तेथे स्वकर्तृत्वावर तंत्रज्ञान उद्योजिका झाली. आता तर ती चक्क अब्जाधिशांच्या यादीत आली आहे. नेमकं हे कसं घडलं हे आपण जाणून घेऊ या…

Advertisement

‘फोर्ब्ज’च्या वृत्तानुसार, जय क्रेप्स, नेहा नारखेडे आणि जून राव हे तिघे लिंक्डइन (LinkedIn) या प्रसिद्ध आणि व्यापक प्रोफेशनल नेटवर्क कंपनीचे कर्मचारी होते. ‘लिंक्डइन’चं व्यवस्थापन सोपं करण्यासाठी या तिघांनी 2011 मध्ये क्लाउड तंत्रज्ञानावर आधारित एक ‘टेक्निकल टूल’ विकसित केलं.

Advertisement

.. पण ही केवळ Linkedin चीच नव्हे, तर अन्य कंपन्यांचीही समस्या असू शकते, असा विचार करुन या तिघांनी ‘क्लाउड’ तंत्रज्ञानावर ‘ओपन सोर्स सॉफ्टवेअर’ (Open Source Software) विकसित केले. त्यासाठी 2014मध्ये ‘कॉन्फ्लुएंट’ नावाची कंपनी उभारली. नेहा या कंपनीची सहसंस्थापक आणि चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर, म्हणजेच तंत्रज्ञानविषयक मुख्य अधिकारी आहे.

Loading...
Advertisement

कॅलिफोर्नियातली कॉन्फ्लुएंट (Confluent IPO) ही कंपनी अमेरिकेतल्या नॅस्डॅक (Nasdaq) या शेअर बाजारात गुरुवारी (24 जून) लिस्ट झाली. 36 डॉलर्स प्रति शेअर या मूल्यासह दाखल झालेल्या आयपीओद्वारे (IPO) कंपनीने 828 दशलक्ष डॉलर उभे केले. परिणामी, कंपनीचं मूल्यांकन 9.1 अब्ज डॉलर झालं.

Advertisement

शेअर बाजाराच्या पहिल्याच दिवसाच्या शेवटी कॉन्फ्लुएंटच्या शेअर्सच्या मूल्यामध्ये जवळपास 25 टक्के वाढ झाली आणि ते मूल्य प्रति शेअर 45.02 डॉलर झाले. अमेरिकन शेअर बाजारात पहिल्याच दिवशी IPO आल्यानंतर एवढा भाव मिळवल्याने Confluent कंपनीची जोरदार चर्चा आहे.

Advertisement

कंपनीचं भांडवली बाजारमूल्य 11.4 अब्ज डॉलरवर गेले. या घटनेमुळे कंपनीच्या तीन पैकी दोन संस्थापक अब्जाधीश झाले. तिसरी संस्थापक अब्जाधीश होण्याच्या वाटेवर आहे. ही तिसरी संस्थापक नेहा नारखेडे..!कंपनी स्थापन केल्यापासून अवघ्या सात-आठ वर्षांत तिने हे यश मिळवलं आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply