Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

उद्योगांना मिळणार स्वस्तात वीज..! राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, पाहा ऊर्जामंत्री काय म्हणाले..?

नागपूर : राज्यातील उद्योजकांना वीजदरात सबसिडी देण्यात येणार असून, राज्य सरकार लवकरच हा निर्णय जाहीर करणार असल्याची माहिती राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली.

Advertisement

राज्यातील उद्योगांना सुरु असलेली वीज दरातील सवलत यापुढेही सुरू ठेवण्यासाठी राज्य सरकार अनुकूल आहे. त्यासाठीचा प्रस्ताव, सूचना आणि त्रुटींचा अभ्यास करुन अभ्यासगट अहवाल सादर करणार आहे. त्यानंतरच याबाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे डाॅ. राऊत यांनी सांगितले.

Advertisement

सध्या शासनाकडून विदर्भ आणि मराठवाड्यातील उद्योजकांना वर्षाला 1200 कोटी रूपयांची सवलत मिळते; पण त्याचा लाभ ठराविक उद्योजकांनाच होत असल्याने संपूर्ण वर्षभर ही सवलत मिळत नाही. राज्य सरकारने या सवलतीचा लाभ सुक्ष्म, लघु व मध्यम औद्योगिक घटकांना देण्यासाठी व्हीआयएच्या (विदर्भ इंडस्ट्रीज असोशिएशन) वतीने सादरीकरण करण्यात आले.

Loading...
Advertisement

विदर्भ इंडस्ट्रीज असोशिएशनसोबत 14 जून रोजी बैठक झाली होती. त्यानंतर विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, डी. आणि डी + क्षेत्रातील औद्योगिक ग्राहकांच्या वीजदर सवलतींचा लाभ सूक्ष्म, लघु आणि मध्यम औद्योगिक घटकांना होण्यासाठी अभ्यासगट स्थापन करण्यात आला. तसेच उपलब्ध वार्षिक मर्यादा रुपये 1200 कोटीचे वाटप योग्य रितीने होण्यासाठी देण्यात येणाऱ्या सवलतींचाही अभ्यास करण्यात आला.

Advertisement

सवलती, औद्योगिक संघटनांचा प्रस्ताव घेऊन, विश्लेषण करण्यात येणार आहे. तसेच उपलब्ध वर्गवारी स्लॅबचे सुसूत्रीकरण, त्रुटीच्या अनुषंगाने अभ्यास करून येत्या 15 दिवसात ही समिती अहवाल सादर करणार आहे. यानंतर ही समिती पुढे येणाऱ्या सर्व प्रस्तावांचा अभ्यास करेल व आपला अहवाल शासनाला सादर करणार आहे. नंतर राज्य सरकार सवलतीसंदर्भात निर्णय जाहीर करणार असल्याची माहिती डॉ. राऊत यांनी दिली.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply