Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

घरात मोक्कार सोनं असेल, तर होईल कारवाई, सोनं बाळगण्यावरही आहे मर्यादा, कशी ते तुम्हीच पहा..?

मुंबई : सध्या कोरोनामुळे सोन्यातील गुंतवणूक (Gold Investment) वाढली आहे. सोनेखरेदीसाठी आपल्याकडे खास मुहूर्त आहेत. पण, गुंतवणूक म्हणूनच नाही, तर अनेक जण अंगावर घालून मिरवण्यासाठीही सोनेखरेदी करतात. तसेच, सध्याच्या काळात गुंतवणुकीसाठी सुरक्षित पर्याय म्हणूनही सोन्याकडे पाहिले जाते.

Advertisement

मात्र.. आहे पैसा म्हणून घेतले सोने, असे करता येत नाही. एका विशिष्ट्य मर्यादेपर्यंतच तुम्ही सोने बाळगू शकता. मर्यादेपेक्षा अधिक सोने तुमच्याकडे सापडल्यास तुमच्यावर कारवाई होऊ शकते. तुम्ही जवळ किती सोने बाळगू शकता. याबाबत कायदा काय म्हणतो, काय कारवाई होऊ शकते, याची माहिती घेऊ या.

Advertisement

कायद्यात एखादी व्यक्ती आपल्याकडे किती सोने ठेऊ शकते, याबाबत काही नियम केले आहेत. इनकम टॅक्स ऍक्ट 1961च्या सेक्शन 132 नुसार तुमच्याकडे मर्यादेपेक्षा अधिक सोने असल्यास टॅक्स अधिकारी ते जप्त करू शकतात.

Advertisement

विवाहित महिला जास्तीत जास्त 500 ग्रॅम सोने बाळगू शकते, तर अविवाहित महिला जास्तीत जास्त 250 ग्रॅमच सोने स्वत:जवळ ठेऊ शकते. पुरूषांना फक्त 100 ग्रॅम सोने ठेवण्याचीच परवानगी आहे. एकीकडे असे नियम असले, तरी सोन्याचा ‘वॅलिड सोर्स’ (Valid source) आणि प्रुफ (Proof) देत असेल, तर त्या सोन्यावर कोणतीही मर्यादा नाही. परंतु विना इनकम सोर्स घरात मर्यादेपेक्षा अधिक सोने ठेवण्यास मनाई आहे.

Loading...
Advertisement

काय कारवाई होऊ शकते?
कायद्यानुसार दागिन्याच्या स्वरूपातील सोन्यासाठी काहीही मर्यादा नाही, फक्त त्याचा ‘इनकम प्रुफ’ देणे गरजेचे आहे. वंश परंपरेने काही सोने मिळाले असेल, तर त्याचा प्रुफ असणे आवश्यक आहे, अन्यथा इनकम टॅक्स अधिकारी (Tax officer)अतिरिक्त सोने जप्त कारवाई करू शकतात. तुम्हाला गिफ्ट (Gift)मध्ये 50 हजारांपेक्षा कमी किमतीचे सोन्याचे दागिने मिळाले असतील, तर त्यावर कर लागत नाही.

Advertisement

संपादन : सोनाली पवार

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply