Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

मैत्री चीनसोबत, मदतीसाठी भारतापुढे हात पसरले, कोरोना संकटात शेजारी देशही हतबल..!

नवी दिल्ली : कोरोनाने अवघे जग आपल्या कवेत घेतला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भारतात हाहाकार उडाला आहे. औषध-उपचार मिळत नाहीत. लसीकरण मोहीम संथ गतीने सुरु आहे. आपल्याकडे अशी परिस्थिती असताना आपल्या शेजारी देशांनाही कोरोनाचा फटका बसला आहे. त्यातही नेपाळमध्ये कोरोनाचा प्रसार (Coronavirus) झपाट्याने होत आहे. तेथील परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. रोज हजारोच्या संख्येनं नवीन रुग्ण समोर येत आहेत. रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.

Advertisement

नेपाळमध्येही कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनचा (Oxygen) मोठा तुटवडा जाणवत आहे. नुकतीच पंतप्रधानपदी निवड झालेल्या के. पी. शर्मा ओली यांची नजर भारताकडे लागली आहे. ओली यांची मैत्री चीनसोबत आहे, मात्र त्यांनाही मदतीची अपेक्षा भारताकडून आहे. के. पी. शर्मा ओली यांचे विदेश सल्लागार रंजन भट्टाराय यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला सांगितलं, की भारतानं या कठीण काळात ऑक्सिजन, आयसीयू बेड आणि व्हेंटिलेटरचा पुरवठा करावा, अशी ओली यांची इच्छा आहे.

Advertisement

चीनसोबत ओली यांचे चांगले संबंध आहेत. कोरोनाविरोधातील लढ्यासाठी चीनकडून औषधं, लसपुरवठा होत आहे. मात्र, ‘लिक्विट ऑक्सिजन’ त्यांच्याकडे नाही. नेपाळमध्ये ऑक्सिजनच्या तुटवड्यानं तेथील चिंता वाढली आहे. ऑक्सिजनची मागणी दहा पटीनं वाढली असून, आम्ही भारत सरकारसोबत चर्चा करीत असल्याचे भट्टाचार्य यानी सांगितलं.

Loading...
Advertisement

नेपाळमध्ये दररोज आठ हजाराहून अधिक नवे रुग्ण समोर येत आहेत. रोज 150-200 रुग्णांचा मृत्यू होत आहे. चीननं नेपाळला कोरोना लसीचे 8 लाख डोस मदत म्हणून दिले आहेत. नेपाळला ‘सिरम इन्सिट्यूटट ऑफ इंडिया’च्या कोविशील्ड (covishild) लसीचेही 10 लाख डोस मिळाले आहेत. मात्र, ‘सिरम’सोबत नेपाळची 20 लाख डोसची ‘डील’ झाली होती. त्यामुळे लवकरच भारतातून लसीचे आणखी डोस मिळतील, अशी नेपाळला आशा आहे.

Advertisement

संपादन : सोनाली पवार

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply