Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

माणुसकीला काळीमा : आक्रीत ‘हे’ घडले की; जमिनीच्या भांडणात करोना रुग्णाने केला असलाही ‘प्रताप’..!

औरंगाबाद / बीड :

Advertisement

अवघ्या जगभरात करोनाची वाढत्री रुग्णसंख्या ही डोकेदुखी बनली आहे. मात्र, भारतात सरकारी आरोग्य यंत्रणा कोलमडून पडल्याचे दुर्दैवी चित्र असतानाच आता आणखी वेगळे आणि धक्कादायक प्रकार घडण्यास सुरुवात झाली आहे. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनाही समोर येत आहेत. एकीकडे ऑक्सिजनअभावी रुग्ण जीव तोडत असतानाच केंद्र सरकार भरपूर प्राणवायू असल्याचे सांगत आहे. सरकारी पातळीवरील असाच कोडगेपणा आता जनतेमध्येही दुर्दैवाने पाहायला मिळत आहे.

Advertisement

करोना हा विषाणू म्हणजे आता काहींनी अस्त्र म्हणून वापरण्यास सुरुवात केल्याचे वास्तव सांगणारी ही धक्कादायक घटना आहे. चीनमधून की नेमका कुठून हा विषाणू फोफावला आणि कोणीतरी ठरवून तर असला विषाणू नाही ना जगभरात आणला अशाही अफवांचे पिक जोमात असते. जैविक अस्त्र वापरून विरोधी राष्ट्रांना निस्तेज करण्याचा तर हा प्रकार नाही ना, यावर तपास चालू असतानाच गावोगावी आता करोना हे अस्त्र म्हणून वापरण्यास काहींनी सुरुवात केली आहे. त्याच प्रकारातील घटना बीड जिल्ह्यात घडली आहे.

Advertisement

केज तालुक्यातील सारुकवाडी येथे असला अघोरी प्रकार घडला आहे. शेत नांगरणीवरून होम आयसोलेशनमधील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाने तोंडाचे मास्क काढून त्याच्या चुलत भावाच्या तोंडावर व अंगावर थुंकल्याची ही घटना सध्या ट्रेंडमध्ये आहे. एकीकडे करोना रुग्णसंख्या कमी करण्यासाठी यंत्रणा साधनांचा अभाव असताना लढत आहे. त्याचवेळी रुग्णसंख्या कमी करण्यासाठी मदत तर नाही, मात्र बोंबलत फिरून देशामध्ये रुग्णसंख्या वाढवण्याचे पातक काहीजण करीत आहेत. त्यातलाच हा प्रकार आहे.

Loading...
Advertisement

‘आमच्या मालकीचे शेत नांगरु नको, तुझेच शेत नांगर’ असे म्हणून करोना रुग्णाने आपल्याच चुलत भावाच्या अंगावर थुंकण्याचा हा प्रकार आहे. माणुसकीला काळिमा फासणारी अशी ही घटना असल्याचे अनेकांनी म्हटले आहे. याप्रकरणी चौघाविरुद्ध जीवघेणा साथ रोग पसरविणे, निष्काळजीपणा व साथ रोग कायद्याचे उल्लंघन करणे, मारहाण व शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी केज पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला  आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply