Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

हेल्थ इन्फो : इम्युनिटी बुस्टिंगसह शक्ती वाढवणारा अन चरबी कमी करणारा ‘हा’ आहे महत्वाचा घटक

पोटाच्या चरबीमुळे आपण अस्वस्थ असाल तर आपण घरच्या घरी काही उपाय करू शकता. जसे की दालचिनीचे सेवन करणे त्यासाठी फायद्याचे ठरू शकते. दालचिनीचे काही महत्वाचे आरोग्यदायी उपयोग आहेत. त्याचबरोबर ओटीपोटातील चरबी व वजन कमी करणे आणि मधुमेह यासारख्या गंभीर आजारांवर याचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे. जर तुम्हाला आजपर्यंत दालचिनीच्या फायद्यांविषयी माहिती नसेल, तर आज आम्ही तुम्हाला गंभीर रोगांवर मात करण्यासाठी दालचिनीचे फायदे आणि औषधी गुणधर्म याबाबत माहिती देत आहोत.

Advertisement
  1. दालचिनीचे फायदे भरपूर आहेत. दालचिनी बर्‍याचदा देशात अन्नामध्ये मसाला म्हणून वापरली जाते. तितकाच आपला याच्याशी कधीमधी साम्बंध्येतो. परंतु औषधी गुणधर्मांमुळे आयुर्वेदिक औषधे बनवण्यासाठीही मोठ्या प्रमाणात याचा उपयोग होतो. दालचिनी हा पदार्थ गरम आहे.
  2. बहुतेकदा वृद्धापकाळात घरातील वडीलधाऱ्या मंडळींना सांधेदुखीची समस्या असते. अशा परिस्थितीत कोमट पाण्यात मध आणि दालचिनीची पूड घालून पेस्ट बनवा आणि सांध्यावर लावा. असे केल्याने काही दिवसात आराम वाटेल.
  3. ओटीपोटात चरबी आणि लठ्ठपणा वाढल्याने त्रास होत असल्यास दररोज एक चमचा दालचिनी पावडर कोमट पाण्यामध्ये घ्यावी. मधुमेहाची साखर वाढणार्‍या आजाराने ग्रस्त असल्यास आणि कडू औषधांचा वापर टाळायचा असेल तर आपण दररोज एक ते दोन चिमूटभर दालचिनीची भुकटी वापरली पाहिजे.
  4. जर आपल्याला दिवसभर थकवा जाणवत असेल तर तसेच लैंगिक संबंधात स्वत:मध्ये कमतरता वाटत असल्यास दोन ग्रॅम दालचिनीची भुकटी सकाळी आणि संध्याकाळी दुधासह घ्यावी. हे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करेल आणि लैंगिक शक्तीही वाढवेल.
  5. यासह सर्दी, खोकला, अँटीबॅक्टेरियल व अँटीफंगल गुणधर्म असलेला हा पदार्थ करोनाच्या कालावधीत खूप महत्वाचा आहे.

संपादन : सुनील झगडे

Loading...
Advertisement

*(ही माहिती आरोग्यदायी आहे. मात्र, तरीही आपल्या फॅमिली डॉक्टरांशी संवाद साधूनच अशा पद्धतीने आयुर्वेदिक उपचार घ्यावेत.)

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply