Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

पथ्यपाणी माहिती : इम्युनिटी बुस्ट करण्यासाठी ‘हे’ पदार्थ खावेत; वाचा आरोग्याचे महत्वाचे मुद्दे

सध्या करोना विषाणूच्या दुसऱ्या साथीमध्ये गावोगावी आणि गल्लोगल्ली मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत आहेत. अशावेळी रुग्णालयातील खर्च कोणालाही परवडणारा नाही. त्यामुळेच अनेकजण आता रोगप्रतिकार शक्ती (इम्युनिटी पॉवर) वाढवण्यावर लक्ष केंद्रित करीत आहेत. बाजारात काही कंपन्यांनी इम्युनिटी बुस्टर मेडिसिन (फूड सप्लिमेंट प्रोडक्ट्स) आणलेले आहेत. त्यालाही खूप मागणी आहे. मात्र, त्याची सत्य-असत्यता शोधण्याचे कोणतेही साधन नाही. अशावेळी घरामध्ये असलेल्या आणि बाजारात सहजपणे मिळणाऱ्या काही घटनाचे सेवन करूनही आपली इम्युनिटी बुस्ट होऊ शकते.

Advertisement

कोरोना विषाणूच्या बाबतीत विचार केल्यास आयजीजी अँटीबॉडी टेस्टने त्याच्या विरोधातील इम्युनिटी समजते. तसेच हिमोग्लोबिनच्या पातळीवरूनही इम्युनिटी कशी असेल याचा ढोबळ अंदाज येतो. हिमोग्लोबिनची आदर्श पातळी पुरुषांत १६ व महिलांत १४ असते. पातळी यापेक्षाही कमी असल्यास रोगप्रतिकार क्षमता कमकुवत असू शकते. अशावेळी आपण खाण्याचे पथ्यपाणी पाळणे खूप आवश्यक आहे. त्यासाठी आपण काही महत्वाचे मुद्दे पाहूया :

Loading...
Advertisement
 • रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याची कृत्रिम पद्धत तात्पुरती असून आैषधे व चांगल्या खाण्यापिण्यामुळे काही दिवसांतच इम्युनिटी वाढवली जाऊ शकते.
 • इम्युनिटी वाढवण्यासाठी बाजरी, चना व मूगडाळी, पालेभाज्या आणि दूधाचे सेवन करणे फायदेशीर आहे.
 • केळी, संत्री, अननस आदी फळे खाऊनही इम्युनिटी वाढते.
 • कोमट पाण्यासाेबत लिंबाचा रस पिणेही हितकारक आहे.
 • बदाम, मनुके आणि खारकांचे सेवन करणे आणि आहारात लसून या पदार्थाचा वापर वाढवणे.
 • खाण्यापिण्यामुळेच नाही तर इतर काही पथ्य पाळणेही इम्युनिटी पॉवर वाढवताना आवश्यक असते.
 • पौष्टिक आहार, मानसिक तणाव कमी, सकारात्मक विचार, नियमित व्यायाम, ७-८ तासांची गाढ झाेप याचाही रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याशी संबंध आहे.
 • मुलांची इम्युनिटी पॉवर जास्त असते. मात्र मग मुलांना संसर्गच होणार नाही असेही नसते.
 • मुलांना अनेक प्रकारचे संसर्ग ‘रिसिव्ह’च होऊ शकत नाही. यामुळे ते बचावतात असे वैद्यकीय तज्ञांचे मत आहे.
 • बाजारात मिळणारी काही प्रोडक्ट्स फूड सप्लिमेंट म्हणून चांगली असतात. त्याने प्रत्यक्षात रोगप्रतिकार क्षमताही वाढते. मात्र त्याची सत्यता तपासणे अत्यंत गरजेचे आहे.

संदर्भ : डॉ. तरुण साहनी (सीनियर कन्सल्टंट, इंटर्नल मेडिसिन, इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल)

Advertisement
 • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
 • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply