Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

करोना लसचा डोस घेतल्यावर दिसू शकतात ‘ही’ लक्षणे; पहा किती प्रभावी आहे लसीकरण

पुणे :

Advertisement

जगातील सुप्रसिद्ध आरोग्य जर्नल लॅन्सेटने कोरोना रोखण्यासाठी लसींच्या दुष्परिणामांविषयी एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार अ‍ॅस्ट्राझेनेकाची लस कोविशील्ड किंवा फायझर याचे डोस घेतल्यावर 25 टक्के लोकांना हलके साइड इफेक्ट्स जाणवत आहेत. परंतु अहवालानुसार या दुष्परिणामांचा प्रभाव जास्त काळ टिकत नाही. म्हणून त्यांच्यापासून घाबरून जाण्याची गरज नाही.

Advertisement

या दोन लसींपैकी कोविशील्ड म्हणून ओळखल्या जाणार्‍या अ‍ॅस्ट्राझेनेका ही लस मोठ्या प्रमाणात भारतात दिलेली आहे. असा अंदाज आहे की, आतापर्यंत भारतातल्या लसींच्या वेळी सुमारे 90 टक्के लस कोविशील्ड दिल्या आहेत. फायझरची लस अद्याप भारतात मंजूर झालेली नाही.पण येत्या काही दिवसांत तिलाही परवागनी मिळेल. कोविशील्ड  लस घेतल्यावर डोकेदुखी, थकवा किंवा वेदना ही सामान्य गोष्ट आहे. या व्यतिरिक्त काही रुग्णांना थंडी वाजणे किंवा थरथरणे, अतिसार, ताप, तीव्र सांधेदुखी, माईलजिया, संधिवात आणि मळमळ यासारखेही लक्षणे दिसतात. या व्यतिरिक्त लसीकरण केलेल्या जागेवर उष्णता किंवा वेदना, सूज, स्पर्श करण्यास त्रास, लालसरपणा, खाज सुटणे किंवा बाजूच्या ग्रंथी सूज यासारखे दुष्परिणाम देखील दिसतात.

Loading...
Advertisement

लंडनच्या किंग्ज कॉलेजमध्ये झालेल्या संशोधनात असे नमूद केले आहे की, लसीकरणाच्या पहिल्या 24 तासांत बहुतेक दुष्परिणामाची लक्षणे दिसून येतात. संशोधनानुसार यापैकी बहुतेक लक्षणे एक किंवा दोन दिवसात बरे होतात. अभ्यासामध्ये असेही म्हटले आहे की, अ‍ॅस्ट्राझेनेका यांनी तयार केलेल्या पहिल्या लसीच्या डोसनंतर संसर्ग दर 39 टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. तर, फायझरच्या लसीकरणाने त्याच काळात संसर्ग दर 58 टक्क्यांनी कमी झालेला दिसला. जर 21 दिवसांपेक्षा जास्त दिवस झाल्यावर हेच प्रमाण अनुक्रमे 60 आणि 69 टक्के इतके होते.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply