Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

जर्मन चपलेचा कोरोनावर ‘ऑक्सिजन उतारा’; फायदे पाहून तोंडात बोटे घालाल..!

पुणे :
देशभर कोरोना संसर्गाच्या दुसरी लाटेने धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णसंख्येचे नवनवे विक्रम होत आहेत. परिणामी, अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. तरीही कोरोनाबाधितांची संख्या कमी होताना दिसत नाही. रुग्णांवर उपचारासाठी रुग्णालये कमी पडत आहेत. त्यातही ऑक्सिजन आणि रेमडिसेव्हर इंजेक्शनला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. ऑक्सिजन बेड मिळवण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. मात्र, एका जर्मन कंपनीने अशा चपला बनविल्या आहेत, की तुमची ऑक्सिजन लेव्हल कधीच डाऊन होणार नाही. चला तर मग या जर्मन चपलेची वैशिष्ट्ये जाणून घेऊ या..!

Advertisement

कोरोना योद्धे आपला जीव पणाला लावून रुग्णांवर उपचार करीत आहेत. या कोरोना योद्ध्यांसाठी आणि रुग्णांसाठी जर्मन कंपनीने खास पद्धतीची चप्पल तयार केली आहे. या चप्पलेमुळं शरिरातील ऑक्सिजनचे प्रमाण वेगाने वाढत असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
साधारणपणे तंदुरुस्त राहण्यासाठी रोज साधारण ८ ते १० हजार पावलं चालण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येतो. मात्र, जर्मन कंपनीने आणलेली चप्पल घालून, तुम्ही केवळ ३ हजार पावलं चालला, तरी रोजचे ८ हजार पावले चालण्याचं टार्गेट पूर्ण होणार आहे. या चप्पलचा फायदा कोरोना रुग्ण आणि कोरोनायोद्ध्यांना अधिक प्रमाणात होईल, असा दावा कंपनीने केला आहे.

Advertisement

इतर शूज किंवा चपलेला ७ तास बॅक्टेरिया चिकटलेले असतात. मात्र, या चप्पलेला सहज सॅनिटाईज करता येऊ शकतं, असंही कंपनीने म्हटलं आहे. कंपनीकडून १० चप्पल कोरोनारुग्ण आणि कोरोना योद्ध्यांना मोफत देण्यात येणार आहेत.
दरम्यान, याबाबत चप्पल व्यावसायिक आशिष जैन यांनी म्हटलं आहे, की जर्मन चप्पल तयार करण्याचं काम सुरू आहे. ही चप्पल घालून ३ हजार पावलं चाललं, तरी ८ हजार पावलं चालल्याचा व्यायाम होतो. या चपलेमुळे चालत असताना प्रत्येक पावलागणिक पायाच्या मांसपेशींना अडीच पट अधिक दाब बसतो. त्यामुळे शरिरातील ब्लड सर्कुलेशन आणि ऑक्सिजन पातळी वेगाने वाढते. या पद्धतीच्या चप्पल तयार करण्यासाठी खास मटेरियल वापरलं जातं, असंही जैन यांनी म्हटलं.

Loading...
Advertisement

संपादन : सोनाली पवार

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply