Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

कोविड ज्ञान : ऑक्सिजनचा वापर आणि करोना कोणत्या ठिकाणी पसरतो, याची माहिती नक्की वाचा

देशातील कोरोना साथीच्या रोगाची दुसरी लाट दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गेल्या 24 तासांत, कोरोनामुळे विक्रमी 2,61,500 नवीन रुग्ण आढळले आहेत आणि 1500 पेक्षा जास्त लोक मरण पावले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार देशात संक्रमित रूग्णांची एकूण संख्या आता एक कोटी 47 लाख 88 हजारांहून अधिक झाली आहे. दरम्यान अनेक राज्यांमध्ये बेड, व्हेंटिलेटर, रेमिडीसीवेर आणि ऑक्सिजनची कमतरता देखील दिसून येते. तर या काळात कोरोना लसीकरणाचा आकडा 12 कोटी 25 लाखांवरही गेला आहे. चला कोरोना आणि लसीशी संबंधित काही महत्त्वपूर्ण प्रश्नांची उत्तरे तज्ञाकडून जाणून घेऊया

Advertisement

ऑक्सिजनची समस्या नसल्यास, परंतु ताप जास्त असल्यास, आपण रुग्णालयात दाखल होऊ शकतो का, यावर दिल्लीतील सफदरजंग रूग्णालयाच्या डॉ. गीता कमपाणी यांनी माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलेय की, जर श्वासोच्छ्वास घेताना अडचण नाही व ऑक्सिजनची पातळी योग्य आहे तर आपण बरे होऊ शकता. परंतु, पॅरासिटामोल खाल्ल्यानंतरही 3-4 दिवसात ताप कमी होत नसेल तर रुग्णाला रुग्णालयात नेलेच पाहिजे. जर रुग्णालयात बेड उपलब्ध नसतील तर आपण घरात ऑक्सिजन सिलिंडरची व्यवस्था करू शकतो. मात्र, अशा परिस्थितीत ऑक्सिजनची गरज भासल्यास व इतर काही क्रिटीकल परिस्थिती उद्भवल्यास अडचण होण्यापेक्षा रुग्णालयात दाखल होणे चांगले असते.

Advertisement

त्यांनी म्हटले आहे की, पॉजिटिव रिपोर्ट येण्यापूर्वीचा आपण दवाखान्याची तयारी ठेवावी. कारण, सगळीकडे हॉस्पिटलमध्ये दोन प्रकारचे बेड आहेत. एक म्हणजे सस्पेक्ट बेड, ज्यावर असे रूग्ण दाखल केले जातात ज्यांच्यात गंभीर लक्षणे आहेत. मात्र, चाचणी अहवाल आलेला नाही. अशा लोकांची मग आरटी-पीसीआर चाचणी केली जाते आणि पॉजिटिव रिपोर्ट आल्यास कोविड वॉर्डमध्ये हलवले जाते.

Advertisement

आकाशवाणी समाचार on Twitter: “अगर ऑक्सीजन की समस्या न हो लेकिन बुखार ज्यादा है तो क्या अस्पताल में भर्ती हो सकते हैं? @PrakashJavdekar @MIB_India @PIB_India @shashidigital https://t.co/sygGhukry2” / Twitter

Loading...
Advertisement

पृष्ठभागावरून विषाणूचे संक्रमण होण्याचा धोका कितपत आहे, यावर डॉ. गीता कमपाणी म्हणतात की, ‘हे त्या व्यक्तीच्या संसर्गाच्या पातळीवर अवलंबून असते. जर विषाणूचा भार जास्त असेल तर खोकला किंवा शिंकण्यामुळे पृष्ठभागावर व्हायरस जास्त असू शकतो. तसेच पृष्ठभाग स्थान मोकळे आहे की बाहेरील यावरही अनेक गोष्टी अवलंबून आहेत. यासह लोखंड, कागद किंवा प्लास्टिक यापैकी कोणता पृष्ठभाग आहे यावरही अनेक गोष्टी ठरतात. त्यामुळे आपण आपले हात नेहमीच स्वच्छ करावेत. तसेच मास्कच्या वापराकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. मास्क वापरायचा आहे हे अजिबात विसरू नका.

Advertisement

डॉ. गीता कमपाणी सांगतात की, लसचे दोन्ही डोस घेतल्यानंतर 15 दिवसांनी अँटीबॉडीज तयार होतात. मात्र, हे लक्षात ठेवा की ही लस विषाणूविरूद्ध 100% प्रभावी नाही. फक्त 80 किंवा 85 % प्रभावी आहे. अशा परिस्थितीत लस घेतलेल्या लोकांना संसर्ग होऊ शकतो. लसपासून बनविलेल्या अँन्टीबॉडीज त्याची तीव्रता कमी करतात. मात्र, आपण सर्वांनी लस घेतल्यावरही काळजी घ्यावी. कोविड प्रोटोकॉल पाळणे हे आपले नागरिक म्हणून कर्तव्य आहे.

Advertisement

संपादन : विनोद सूर्यवंशी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply