Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

पपई खाऊन बिया फेकून देताय..; वजन कमी करण्यासह ‘त्या’साठीही उपयोगी आहेत या बिया

पपई खायला आपल्या सर्वांना आवडते. अनेकदा त्यातील बिया या खाण्यातला मोठा अडसर वाटतात. मात्र, या बिया खूप उपयोगी आहेत. होय, मित्र-मैत्रिणींनो, या बिया वजन कमी करण्यासह इतर अनेक कारणासाठी आपण वापरू शकता. आज आपण याचेच फायदे पाहणार आहोत.

Advertisement

पपईचा गर खाल्ल्यानंतर बरेचदा लोक त्याच्या बिया फेकून देतात. परंतु या बिया आरोग्यासाठी वरदानापेक्षा काही कमी नाहीत. वजन कमी करण्यासाठी आणि इतर अनेक आजारांपासून मुक्त होण्यासाठी पपईच्या बिया कशा वापरायच्या ते जाणून घेऊया.

Advertisement

पपईमध्ये भरपूर अँटीऑक्सिडेंट्स, खनिजे आणि अगदी कमी कॅलरी असतात. पपईमध्ये आढळणारे एंझाइम्स केवळ वजन कमी करत नाहीत तर खराब कोलेस्ट्रॉलदेखील कमी करतात. वजन कमी करण्यासाठी आपण 10 ते 15 दिवस वाळलेल्या पपईच्या बियापासून बनविलेली चमचाभर पावडर खावि. एका दिवसात फक्त 5 ते 8 ग्रॅम बियाणे किंवा पावडरच घ्यावी. लिंबाच्या रसमध्ये किंवा कोशिंबीरीच्यावर बियाची पावडर टाकूनही आपण खाऊ शकतो.

Advertisement

पपईच्या बियांमध्ये वृद्धत्वविरोधी गुणधर्म असतात. ते आपल्या त्वचेची चमक कायम राखण्यास तसेच सुरकुत्या दूर ठेवण्यास मदत करतात. पपई खातानाही आपण या बिया खाऊ शकता. यानंतर पाणी प्या. असे केल्यास त्वचेवर सुरकुत्या आणि बारीक रेषा दिसणार नाहीत.

Loading...
Advertisement

पपईच्या बियामध्ये उच्च प्रमाणात पाचन एंजाइम असतात. जे प्रथिने तोडण्यात मदत करून नैसर्गिक पाचक प्रक्रियेस मदत करतात. निरोगी पद्धतीने पचनासाठी पपईच्या बिया वाळवून बारीक करून ही पावडर कोमट पाण्यात रोज घ्या.

Advertisement

संपादन : संतोष शिंदे   

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply