Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

म्हणून मुंडेंचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडले; पहा नेमका काय प्रकार घडलाय

बीड / औरंगाबाद :

Advertisement

बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीदरम्यान परळी मतदान केंद्रावर शनिवारी दुपारनंतर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. येथील स्थानिक राष्ट्रवादी आणि भाजप कार्यकर्ते मतदान केंद्रावरच एकमेकांशी भिडले. त्यामुळे येथे वातावरणात तणावपूर्ण शांतता आहे.

Advertisement

बँकेवर प्रशासन बसवण्याचं सत्ताधारी पक्षाचं कारस्थान आहे, म्हणून आम्ही बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याचे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी अगोदरच जाहीर केले होते. त्यामुळे अगोदरच काहीतरी होण्याची शक्यता व्यक्त करून पोलिसांनी खबरदारी घेतली होती. मात्र, तीही काहीच कमी आली नाही.

Advertisement

दुपारी उशिरा चार वाजल्यानंतरही मतदान सुरु असल्याने येथे तणाव निर्माण झाला. भाजप कार्यकर्त्यांनी यास विरोध केला. त्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि परिणामी बंडान सुरू झाले. दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्यानंतर खुर्च्यांची तोडफोड करण्यात आली.

Advertisement

पंकजा मुंडे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना याबाबत म्हटले की, काहीही कारण नसताना आमचे उमेदवारी अर्ज रिजेक्ट करण्यात आले. सरकारकडून हा आमच्यावर अन्याय आहे. कोरम पूर्ण होण्यासाठी ही उमेदवार संख्या ठीक नाही, त्यामुळे नैसर्गिक प्रशासक येणे हे ठीक आहे. मात्र बँकेवर प्रशासन बसवण्याचं कारस्थान सत्ताधारी पक्षाचं आहे. म्हणून आम्ही या निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे.

Loading...
Advertisement

त्यांना दोन जागेवर उमेदावर मिळाले नाही. पराभव आणि यश चालत असते. पराभवाला अनेक मोठ-मोठे लोक सामोरे गेले आहेत. पराभवाचा संबंध अब्रूशी लावू नये. पळपुटेपणा हा सरकारी पक्षाने केला आहे. ही निवडणूक होऊ नये यासाठी सहकार मंत्र्यांकडून दबाव आणण्यात आला. पळपुटेपणा सत्ताधारी करत आहेत. एवढी चांगली चाललेली बँक, हिच्यावर प्रशासक आणण्याची वेळ आणली. सरकारचा गैरवापर त्यांनी केला आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply