Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

पोल्ट्री अपडेट : उन्हाळ्यात अशी ‘घ्या’ कोंबड्यांची काळजी; मुद्दा आहे आर्थिक व्यवस्थापनाचा

मार्च महिन्यात उन्हाळा जाणवू लागला आहे. दुपारच्या वेळेस तापमानात वाढ होऊन कडाक्याचे उन पडत आहे. माणसांप्रमाणेच प्राण्यांनाही उन्हाळा असह्य होत आहे. या काळात जनावरांच्या आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे ठरते. राज्यात पोल्ट्री व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. उन्हाळ्याच्या दिवसात पोल्ट्री फार्मची विशेष काळजी घ्यावी लागते. या काळात काय काळजी घ्यावी हे जाणून घेऊया..

Advertisement

उन्हाळ्यात दिवसेंदिवस वाढत जाणारे तापमान आणि शारिरीक बदलांशी लढणारी प्रतिकारके तयार होण्यासाठी शरीरात जे जीवनसत्व आणि खनिजांची आवश्यकता असते ते उपलब्ध होत नसल्याने कोंबड्यांच्या शरीरात प्रतिकारके निर्माण होण्यात अडथळे येतात. त्यामुळे उन्हाळ्यात पोल्ट्री व्यवस्थापनात काही महत्वाचे बदल करणे क्रमप्राप्त ठरते.

Advertisement


उन्हाळ्यात तापमानात सातत्याने वाढ होत असते. या वाढत्या तापमानाचा त्रास प्राण्यांना होतो. वाढत्या तापमानामुळे हवेतील आर्द्रता कमी होते. त्यामुळे कोंबड्या उष्माघातास बळी पडतात. त्यामुळे ब्रॉयलर कोंबड्यांचे योग्य व्यवस्थापन आवश्यक ठरते. कोंबड्यांच्या सभोवतीचे तापमान ३८ अंश ते ४० अंश सेल्सिअसपर्यंत जाते, त्यावेळी कोंबड्यांना याचा त्रास होतो. ब्रॉयलर कोंबड्यांच्या वाढीसाठी १८ ते २३ अंश सेल्सिअस हे तापमान योग्य असते.

Advertisement

मात्र, उन्हाळ्यात दिवसा शक्यतो तापमान जास्तच असते. त्यामुळे कोंबड्यांना याचा त्रास होण्याची शक्यता असते. कोंबड्यांमध्ये घामग्रंथी नसतात. त्यामुळे उष्णतेचा त्रास कमी करण्यासाठी कोंबड्या जास्त पाणी पितात. ज्यावेळी तापमान एक अंश सेल्सिअसने वाढते तेव्हा कोंबड्या १ ते १.५ टक्क्यांपर्यंत कमी खाद्य खातात. तसेच ज्यावेळी तापमान ३२ ते ३८ अंश सेल्सिअस असते, त्यावेळी कोंबड्यांच्या खाद्याचे प्रमाण पाच टक्के कमी होते. खाद्य कमी खात असल्याने जीवनसत्वे, प्रथिने, खनिजे देखील कमी प्रमाणात मिळतात. त्यामुळे कोंबड्यांची प्रतिकार शक्ती कमी होऊन आजार होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे कोंबड्यांना उन्हाळ्यात जास्त त्रास होतो.

उन्हाळ्यात या बदललेल्या परिस्थितीचा विचार करुन त्यानुसार पोल्ट्रीमध्ये काही महत्वाचे बदल करणे आवश्यक ठरते. यामध्ये प्रामुख्याने पोल्ट्री शेडच्या बांधकामाची दिशा पूर्व पश्चिम राहिल याबाबत दक्षता घ्यावी. यामुळे सूर्य किरणे थेट पोल्ट्रीमध्ये येणार नाहीत. पोल्ट्री शेडला बाहेरुन पांढरा तर आतल्या बाजूस चुना लावावा. या बदलामुळे सूर्य किरणे परावर्तित होतील.

Advertisement


पोल्ट्रीमध्ये हवा खेळती राहिल याकडे विशेष लक्ष द्यावे. त्यापद्धतीने नियोजन करावे. शेडमध्ये एखादे थर्मामीटर असावे जेणेकरुन याठिकाणचे तापमान कळण्यास मदत होईल. पोल्ट्रीचे छत गहू, भात पिंजाराने आच्छादन करावे. खिडक्यांना पडदे बसवावेत, यावर पाणी टाकावे. अशा पद्धतीने पोल्ट्रीतील वातावरण थंड ठेवण्यासाठी नियोजन करावे.

Loading...
Advertisement


यानंतर पाण्याचे नियोजन महत्वाचे ठरते. एक कोंबडी साधारण एक किलो खाद्यामागे दोन लीटर पाणी पिते. त्यानुसार खाद्य व पाण्याचे नियोजन करावे, कारण उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढलेली असते. दिवसातून चार ते पाच वेळेस पाण्याची भांडी थंड पाण्याने भरुन ठेवावीत.

Advertisement

उन्हाळ्याच्या दिवसात पोल्ट्रीतील कोंबड्यांना दिवसातून दोन वेळेस खाद्य द्यावे, यामध्ये सकाळी व संध्याकाळी अशा दोन वेळेत खाद्य देण्याचे नियोजन करावे. खाद्यामध्ये  जीवनसत्व सी आणि ई चा समावेश करावा, यामुळे शरीरातील प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. खाद्यामध्ये मँगेनीज, लोह, झिंक, सेलेनियम, कॉपर, आयोडीन, कॅल्शियम या खनिजांचा समावेश असावा.

Advertisement

संपादन : मुकुंद भालेराव

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply