Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

मोदी सरकारच्या काळात देशाचा ‘अच्छा मूड’; पहा मुडीजने नेमके काय म्हटलेय

मुंबई :

Advertisement

देशाची अर्थव्यवस्था नकारात्मक स्थिती दर्शवत असल्याने केंद्र सरकार आणि अनेक अर्थतज्ञ विचारांच्या तंद्रीत असतानाच आता मुडीज या जगप्रसिद्ध पतमानांकन संस्थेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशाचा मूड अच्छा राहणार असल्याचे संकेत दिले आहेत.

Advertisement

मूडीज अ‍ॅनालिटिक्सने शुक्रवारी सांगितले की, डिसेंबर 2020 रोजी संपलेल्या तिमाहीत सकल देशांतर्गत उत्पाद (जीडीपी) विकास दर अपेक्षेपेक्षा 0.4 टक्क्यांनी जास्त आहे. मागील तिमाहीत अर्थव्यवस्था 7.5 टक्क्यांनी घसरली होती.

Advertisement

मूडीज टीमने म्हटले आहे की, निर्बंधांमुळे मागणी कमी झाली होती. मात्र, आता देश-विदेशातील मागणी सुधारली आहे. यामुळे गेल्या काही महिन्यांत उत्पादन क्षेत्राला अच्छे दिन दिसत आहेत. अंदाज आहे की पुढील तिमाहीत खाजगी खप आणि अनिवासी गुंतवणूक वाढेल. ज्यामुळे 2021 मध्ये देशांतर्गत मागणीत सुधारणा होऊन जीडीपीचा वास्तविक विकास दर 12 टक्के राहील.

Advertisement

यावर्षी व्याजदरामध्ये कोणतीही अतिरिक्त कपात अपेक्षित नाही. रेपो दर 4 टक्क्यांच्या खाली राहील. 2021-22 च्या बजेटमधून वार्षिक वित्तीय तूट जीडीपीच्या 7 टक्क्यांपर्यंत पोहोचेल असा अंदाज असल्याचे मुडीज यांनी म्हटले आहे.

Loading...
Advertisement

वर्षभरात महागाईचा दर नियंत्रित पद्धतीने वाढेल. तथापि, अन्नपदार्थ किंवा इंधनातील महागाईचा परिणाम घरातील खर्चावर होईल. यासह मूडीजने म्हटले आहे की कोविड संसर्गाची दुसरी लाट तीव्र होत गेली तर सुधारणा आणि नुकसान होण्याचा धोकाही संभवतो.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply