Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

झोमेटो घेऊन येतोय आयपीओ; पहा कधी अन केंव्हा मिळणार इंव्हेस्टमेंटची संधी

मुंबई :

Advertisement

भारतीय फूड डिलिव्हरी स्टार्टअप झोमाटोने आतापर्यंत लोकांना घरोघरी पोचवून लोकांची पोटापाण्याची सोय केली असून आता गुंतवणूकदारांना पैसे मिळवण्याची संधीही ते देणार आहेत आहे. होय, ही कंपनी शेअर बाजारात येणार आहे.

Advertisement

झोमाटो एप्रिलमध्ये आपल्या आयपीओसाठी अर्ज करू शकेल, असे समजते. याद्वारे, $ 65 कोटी डॉलर अर्थात 4708.73 कोटी रुपये उभे करण्याची कंपनीची योजना आहे. कंपनी या वर्षाच्या सप्टेंबर 2021 अखेरपर्यंत लिस्टिंग करू शकते. तथापि, अंतिम निर्णय घेण्यास अद्याप बाकी असल्यामुळे आयपीओचे आकार आणि वेळेतही बदल होऊ शकतात.

Advertisement

चिनी व्यापारी जॅक माच्या अँट ग्रुपचीही झोमाटोमध्ये भागीदारी आहे. 2008 मध्ये ही सेवा सुरू झाली होती. कंपनीच्या वेबसाइटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार 5 हजारहून अधिक कामगार त्याला जोडलेले आहेत. झोमाटोने अलीकडे काही गुंतवणूकदारांकडून 25 कोटी डॉलर जमा केले आहेत.

Advertisement

फेब्रुवारी महिन्यात इन्फो एज इंडिया लिमिटेड कंपनीच्या गुंतवणूकदाराने दिलेल्या एक्सचेंज फाइलनुसार, 250 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक मिळाल्यानंतर जोमाटो आता 540 दशलक्ष डॉलर्स (39118.71 रुपये) आकाराची कंपनी आहे.

Loading...
Advertisement

कोरोना साथीच्या आजारामुळे बहुतेक भारतीयांच्या खरेदीच्या सवयी बदलल्या आहेत. ते ऑनलाइन शॉपिंगकडे वळले आहेत. यामुळे झोमाटोसारख्या ई-कॉमर्स कंपन्यांना आयपीओ सुरू करण्याची संधी निर्माण झाली आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply